Vardhapan bannr

Vardhapan bannr

आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh

कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी पुन्हा २ कोटी मंजूर – आ. आशुतोष काळे

 कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी पुन्हा २ कोटी मंजूर – आ. आशुतोष काळेकोपरगाव प्रतिनिधी:--- कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नातून कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारने दोन कोटी रुपये निधी मंजूर केला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव तालुक्यात मागील पाच वर्षात रस्ते विकासाचा मोठा अनुशेष निर्माण झाल्यामुळे तालुक्यातील जनता खराब रस्त्यांना वैतागली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी कोपरगाव तालुक्याच्या जनतेला सर्वांगीण विकास करण्याचे वचन दिले होते.त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी रस्ते विकासाला प्राधान्य देवून महाविकास आघाडी सरकारकडून रस्त्यांसाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना यश मिळत असून आजपर्यंत कोट्यावधी रुपयांचा निधी रस्त्यांसाठी मिळविला असून महाविकास आघाडी सरकारने पुन्हा एकदा कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्ते व पूल दुरुस्तीसाठी लेखाशीर्ष ३०५४/२४१९ अंतर्गत दोन कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. यामध्ये दहेगाव येथील विलास देशमुख घर ते गुलाबराव देशमुख घर -१६ लाख, वेस येथील मच्छिंद्र कोल्हे घर ते जालिंदर कोल्हे घर-२० लाख, जेऊर कुंभारी येथील रा.मा. १२ ते संजयनगर वस्ती-२० लाख, सुरेगाव येथील सुरेगाव गावठाण ते यशवंत निकम घर रस्ता-२६ लाख, धामोरी येथील धामोरी वेस रस्ता ते बाळासाहेब दरेकर शेती रस्ता -२० लाख, सोनारी येथील पुंजाबा सांगळे घर ते ज्ञानदेव पवार घर रस्ता -१० लाख, कोळपेवाडी  येथील कोळपेवाडी गाव  ते राज्य मार्ग ७ रस्ता -४० लाख, नाटेगाव येथील किरण कुदळे घर रस्ता ते राजेंद्र मोरे घर रस्ता -१६ लाख, वारी येथील महेश टेके घर रस्ता ते कोळनदी रस्ता -०८ लाख, कासली येथील राजेंद्र मलिक घर रस्ता ते बाबुराव मलिक घर  रस्ता -१६ लाख, उक्कडगाव येथील कैलास निकम घर रस्ता ते देविदास निकम घर रस्ता - ८ लाख या रस्त्यांसाठी एकून दोन कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.

कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील उर्वरित रस्त्यांसाठी निधी मिळावा यासाठी प्रयत्नशील असून या रस्त्यांसाठी देखील लवकरात लवकर निधी मिळवून या रस्त्यांचे नुतनीकरण करून नागरिकांना होत असलेल्या अडचणी दूर करणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले असून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांचे आभार मानले आहे

Post a Comment

0 Comments