आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

माध्यमिक शिक्षक संघटनेची कर्मवीर शंकरराव काळे कोविड केअर सेंटरला ५० हजाराची मदत

 माध्यमिक शिक्षक संघटनेची कर्मवीर शंकरराव काळे 

कोविड केअर सेंटरला ५० हजाराची मदतकोपरगाव प्रतिनिधी- कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने कर्मवीर शंकरराव काळे कोविड केअर सेंटरला ५० हजाराची मदत दिली असून या मदतीचा धनादेश नुकताच आमदार आशुतोष काळे यांच्याकडे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुपूर्द केला आहे.

            जीवघेण्या कोरोना संकटापासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरात जम्बो कोविड केअर सेंटर व एसएसजीएम महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहात १०० ऑक्सिजन बेडचे कर्मवीर शंकरराव काळे डेडीकेटेड कोविड केअर सेंटर सुरु केले. त्याठिकाणी उपचार घेत असलेल्या बाधितांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यांनी प्रशासनाला व आरोग्य विभागाला सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिल्यामुळे कोपरगाव तालुक्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला. आजही कोपरगाव तालुक्यात जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत उपचार घेत असलेले रुग्ण अतिशय कमी आहेत. आमदार आशुतोष काळे जीवाची पर्वा न करता समाजासाठी अहोरात्र झटत असून ते करीत असलेल्या समाजकार्याला अल्पशी मदत द्यावी या शिक्षक सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून कर्मवीर शंकरराव काळे कोविड केअर सेंटरला ५० हजाराची मदत देत असल्याचे माध्यमिक शिक्षक संघटनेच्या शिक्षकांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष विलासराव वाकचौरेरयत शिक्षण संस्थेचे माजी विभागीय अधिकारी एन.एस. सोनवणेसुरेश बोळीज,गजानन शेटेअरुण बोरनारेप्रवीण नीळकंठनरेंद्र ठाकरेरामदास गायकवाडभास्कर काजळेमनोहर म्हैसमाळेकर्णासाहेब शिंदेरमेश मोरेउमेश पवार,दिपक भोये आदीसह शिक्षकबंधू उपस्थित होते.

यावेळी बोलतांना आमदार आशुतोष काळे म्हणाले की, मतदार संघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने मतदार संघातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी सर्वोतोपरी उपाययोजना केल्या. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन बेडची निर्माण झालेली कमतरता भरून काढण्यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात ५० ऑक्सिजन बेडचे काम प्रगतीपथावर आहे. दोन ऑक्सिजन प्रकल्प उभारल्यामुळे ऑक्सिजनच्या बाबत अडचणी येणार नाहीत. तरीदेखील भाविष्यात अजूनही उपाययोजना करतांना मागेपुढे पाहणार नाही. या जीवघेण्या कोरोना संकटात माध्यमिक शिक्षक संघटना सामाजिक बांधिलकी जोपासत मदतीसाठी पुढे आली हा समाजासाठी वेगळा आदर्श असून त्यांनी दिलेली मदत स्वागतार्ह असल्याचे   सांगितले

Post a Comment

0 Comments