विकासाचे अनुत्तरीत प्रश मार्गी लावणे माझे आद्य कर्तव्य – आ. आशुतोष काळे
कोपरगाव प्रतिनिधी:---- मा. खा. कर्मवीर शंकररावजी काळे यांनी सर्वसामान्य जनतेचा विचार करून तालुक्यात विकासाचा पाया रचला. तो वारसा माजी आमदार अशोकरावजी काळे यांनी पुढे चालवत तालुक्याच्या विकासाचे महत्वाचे अनेक प्रश्न सोडविले आहेत. मला देखील जनतेने सेवा करण्याच्या दिलेल्या संधीतून हा वारसा पुढे चालविण्याची माझी जबाबदारी असून हि जबाबदारी पूर्ण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू अशी ग्वाही देत कोपरगाव तालुक्याच्या विकासाचे अनुत्तरीत प्रश मार्गी लावणे हि माझी फक्त जबाबदारीच नाही तर ते ते माझे आद्य कर्तव्य असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथे ४८ लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या बाळासाहेब देवकर घर ते अनिल चव्हाण घर रस्ता, पद्माकांत कुदळे घर ते बापूसाहेब बोरावके घर रस्ता, प्रभाकर बोरावके विहीर ते राजेंद्र अंबर घर रस्ता व दत्तमंदिर ते छबुराव आव्हाड घर रस्त्यांच्या डांबरीकरण व मजबुतीकरण कामाचे व दत्तमंदिर परिसर येथे बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचे भूमीपूजन तसेचसंवत्सर येथे येथे २४ लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या बबनराव बारहाते वस्ती ते कोद्रे वस्ती रस्ता व पोपट गायके वस्ती ते अरुण जगताप वस्ती रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमीपूजनआ.आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, मागील पाच वर्षात अनेक गावांना सापत्नपणाची वागणूक दिली गेली. मी मात्र संपूर्ण मतदार संघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने सर्वच गावातील नागरिकांपर्यंत विकास कसा पोहोचेल यासाठी माझे प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे विरोधकांच्या शेजारील जरी गाव असले तरी त्या गावातील नागरिकांना अपेक्षित असलेली विकासकामे करणार आहे. मतदार संघातील अनेक गावांचा रस्ते, पाणी, विजेचे प्रश्न देखील प्रलंबित आहेत याची मला जाणीव असून जनतेने निर्धास्त राहावे. कोरोनाच्या संकटात देखील आपण निधी मिळविला आहे त्यामुळे पुढील काळात मतदार संघाच्या विकासासाठी अजून निधी आणून निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करू असे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सभापती सौ. पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुनराव काळे, कारभारी आगवन,छबुराव आव्हाड, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक पद्माकांत कुदळे, विठ्ठलराव आसने,बाळासाहेब बारहाते, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके,श्रावण आसने, बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र निकोले, दिनार कुदळे, छगणराव देवकर, दिलीपराव गायकवाड, लक्ष्मण देवकर, डॉ. चंद्रशेखर आव्हाड,सुरेश देवकर, अनिल चव्हाण, किसनराव आहेर,शशिकांत देवकर, दिलीपराव बोरनारे, चांगदेव आगवन, अॅड. शिरीष लोहकणे, अॅड. आर.टी. भवर, बाळासाहेब देवकर, किसनराव देवकर,भाऊसाहेब देवकर, गणेश देवकर, शिवाजीराव देवकर, धनंजय देवकर, दत्तात्रय देवकर, बाळासाहेब मालकर, जगन्नाथ देवकर, अमोल देवकर, बाबासाहेब देवकर, राहुल जगधने, प्रशांत वाबळे,सनी आव्हाड,सुरेश देवकर, नारायण बर्डे, सादीक शेख, रावसाहेब मोरे, राजेंद्र गायकवाड, प्रशांतजी निकम, बाबासाहेब कासार, संपतराव भारुड, उद्धव बोरावके, बाळासाहेब जगताप, बबनराव बारहाते, राजेंद्र भाकरे, साहेबराव भोसले, बाळासाहेब रोहोम, विजय भोसले, मच्छिंद्रनवगिरे, अशोक होले, प्रशांत बारहाते, दत्तात्रय देवकर,राहुल जगताप, ग्रामपंचायत सदस्य तुषारजी बारहाते,गोवर्धनज परजणे, सुनीलजी कुहिले, कुमावत,उपअभियंता प्रशांत वाकचौरे, पंचायत समिती शाखा अभियंता लाटे, दहिफळे, ग्रामसेवक विजय पाटील आदींसह टाकळी ग्रामस्थ उपस्थित होते.
आ.आशुतोष काळे विरोधकांना पुरून उरतील -----
चौकट – मागील पाच वर्षापासून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला विकासाची चव चाखायला मिळाली. दीड वर्षापसून मतदार संघाच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी येत आहे त्या माध्यमातून अनेक गावात विकासकामे सुरु आहेत. गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागला आहे. कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचा आदर्शवत कारभार सुरु आहे हे सर्व एकटे आ. आशुतोष काळे करीत आहेत. जनतेच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अठरा तास राबणारा लोकप्रतिनिधी त्यांच्या रूपाने मतदार संघाला लाभला असूनप्रतिकूल परिस्थितीत देखील कोपरगावची वाटचाल समृद्ध विकासाकडे सुरु आहे. मात्र ज्यांच्याकडे विकास पाहण्याची दृष्टीच नाही त्यांना विकास दिसणारच नाही. आ. आशुतोष काळे जरी एकटेच किल्ला लढवत असले तरी मतदार संघातील जनता त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे कोणी कितीही कोल्हेकुई केली तरी आ. आशुतोष काळे एकटे विरोधकांना पुरून उरतील – कारभारी आगवण.
0 Comments