गौतम पोलिटेकनिक च्या विद्यार्थ्यांची बजाज ऑटो मध्ये निवड
कोपरगाव प्रतिनिधी:--- कर्मवीर शंकरराव काळे एजुकेशन सोसायटीच्या कोळपेवाडी येथील गौतम पॉलिटेक्निक इंस्टीट्युट च्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांची बजाज ऑटो लिमिटेड या कंपनी मध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे अशी माहिती गौतम पॉलिटेक्निक इंस्टीट्युटचे प्राचार्य प्रा.सुभाष भारती व प्लेसमेंट अधिकारी प्रा.राम कोकाटे यांनी दिली.
दरवर्षी महाविद्यालयातील तृतीय वर्षातील सर्वच विद्यार्थ्यांना निकालापूर्वीच नामांकित कंपन्या नोकरीत सामावून घेत आहे.महाविद्यालयाचा निसर्गरम्य परिसर सर्व सोयीयुक्त वर्कशॉप विभाग, प्रयोगशाळा विभाग व विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी परिश्रम घेणारे प्राचार्य व सहकारी प्राध्यापक या सर्व सुविधांमुळे महाविद्यालयाचा निकाल १०० % आहे . त्यामुळे गौतम पॉलिटेक्निक इंस्टीट्युट च्या माध्यमातून अभियंता होण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे . इंजिनीअर झाल्यानंतर महाविद्यालयाच्या प्रयत्नातून या विद्यर्थ्यांचे नोकरीचे देखील स्वप्न पूर्ण होत आहे. त्यामुळे गौतम पॉलिटेक्निक इंस्टीट्युट मध्ये प्रवेश घेवून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी शासकीय नोकरीत तसेच बहुसंख्य नामांकित कंपन्यांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहे . तसेच गौतम पॉलिटेक्निक इंस्टीट्युट मधिल तृतीय वर्षातील विद्यार्थी कु.आरती शिवाजी चिने, कु.कामिनी सोमनाथ गावंडे, कु.प्राजक्ता अशोक जोरे, कु.स्नेहल दीपक राजगुरू,यश शशिकांत पोळ,वैभव पुंजाहारी नवले ,मंगेश गोपीनाथ गायकवाड,अभिषेक भाऊसाहेब आदिक यांची नुकतीच बजाज ऑटो लिमिटेड कंपनी पुणे मध्ये निवड झालेली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कर्मवीर शंकरराव काळे एजुकेशन सोसायटीचे चेअरमन मा. माजी आमदार अशोकराव काळे,विश्वस्त आमदार आशुतोष काळे, व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड मानद सचिव सौ.चैतालीताई काळे तसेच सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन
0 Comments