आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

२८ कामांना स्थगिती मिळवून कोपरगावकरांची पूर्ण जिरवली आता जखमेवर मीठ चोळू नका- विरेन बोरावके

 

२८ कामांना स्थगिती मिळवून कोपरगावकरांची पूर्ण जिरवली आता जखमेवर मीठ चोळू नका- विरेन बोरावके


              कोपरगाव प्रतिनिधी :----  ज्या विश्वासाने कोपरगाव शहरातील जनतेने कोपरगाव नगरपरिषदेत बहुमत दिले त्या विश्वासाला तिलांजली देऊन नगराध्यक्षपदी झालेला पराभव विसरता न आल्यामुळे २८ कामांना स्थगिती मिळवून कोपरगावकरांची पूर्ण जिरविली आहे. आपल्या कार्यकर्त्यांना पदे देऊन विकास करण्यापासून दूर ठेवायचे आणि वरून जिरवा-जिरवीची भाषा करायची हे आपल्याला शोभत नाही. भले आपण आपल्या नगरसेवकांना विकासकामे करू देऊ नका मात्र मिश्कील टिप्पण्या करून शहरवासीयांच्या जखमेवर मीठ चोळू नका, असा सल्ला राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे गटनेते नगरसेवक विरेन बोरावके यांनी विवेक कोल्हे यांना दिला आहे.


            कोपरगाव नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदग्रहण प्रसंगी विवेक कोल्हे यांनी कोपरगाव करांची जिरवु नका अशी मिश्कील टिप्पणी केली होती. त्या टिप्पणीला कोपरगाव शहरवासीयांच्या वतीने विरेन बोरावके यांनी त्यांना प्रसिद्धी पत्रकातून उत्तर दिले आहे. प्रसिद्धी पत्रकात बोरावके पुढे असे म्हटले आहे की, कोल्हेंना कोपरगावच्या विकासाशी देणघेण नाही. दर सहा महिन्याला खांदेपालट करायचा आणि कार्यकर्ते खुश ठेवायचे एवढेच त्यांनी मागील पाच वर्षात केले आहे. त्यांना विकासाशी चाड असती तर पाच नंबर साठवण तलाव मागील पाच वर्षात सहज झाला असता कारण त्यांच्या पक्षाचे राज्यात व केंद्रात सरकार होते. मात्र नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासठी विकास न होवू देण्याचा विडा उचलेल्या कोल्हे यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या बहुमताचा व राज्यातील सत्तेचा फायदा त्यांनी विकासासाठी न करता शहराचा विकासनिधी दुसरीकडे वळवून शहरवासियांना विकासापासून वंचित ठेवून बदला घेतला. मात्र त्याची किंमत देखील त्यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मोजावी लागली. त्यामुळे सुडाने पेटून उठलेले कोल्हे कुटुंबाला ज्या ज्यावेळी शहरातील जनतेवर सूड उगवायच्या संधी मिळाल्या त्या एकही संधी कोल्हेंनी सोडल्या नाहीत. जिरवा जीरवीची भाषा करणाऱ्यांनी चार नंबर साठवण तलावाच्या कामाला  व  पाच नंबर साठवण तलावाच्या कामात  खोडा घालून शहरातील जनतेची जिरवली. त्याचबरोबर शहराचे क्रीडा संकुल पळविले, ज्या स्विमिंग टँकवर शहरातील एकही नागरिक जात नाही त्या स्विमिंग टँकवर पैशाची उधळपट्टी करून जनतेची जिरवली व  जाता जाता २८ विकासकामांना स्थगिती मिळवून पुन्हा एकदा शहरातील जनतेची जिरवून त्यांनी स्वत:ची मनशांती करून घेतली. त्यांनी पाच वर्ष जनतेची जिरवण्यातच वाया घातली असतांना त्यांचेच युवराज जिरवा जीरवीच्या मिश्कील टिप्पण्या करून शहरवासीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या टिप्पण्या करून नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळू नका असे बोरावके यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments