Vardhapan bannr

Vardhapan bannr

आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh

दिव्यागांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध – आ. आशुतोष काळे

   दिव्यागांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध – आ. आशुतोष काळे

             


कोपरगाव प्रतिनिधी:---  कोपरगाव विधानसभा मतदार संघातील जनतेने मला निवडून दिले त्यामध्ये दिव्यांग बंधू-भगिनींचा देखील समावेश आहे. त्यांच्या मदतीसाठी सदैव तयार असून दिव्यांग बंधू-भगिनींना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी दिली.

                 कोपरगाव येथे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते कोपरगाव विधानसभा मतदार संघातील दिव्यांग बंधू-भगिनींना अपंगत्वाचे शासकीय प्रमाणपत्र देण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, दिव्यांग बंधू-भगिनींना दैनंदिन जीवनात अनंत अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे या अडचणी दूर करण्यासाठी त्यांना शासनाकडून दिले जाणारे अधिकृत दिव्यांग शासकीय प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक आहे. या प्रमाणपत्राच्या माध्यमातून दिव्यांग बंधू-भगिनींना  शासनाच्या विविध योजनांचा लाभ सहजपणे  मिळविता येणे सहज शक्य होते. त्यांना जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करून शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळवून देवून त्यांचे जीवन सुखकर व्हावे यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच मतदार संघातील ज्या दिव्यांग बंधू-भगिनींना अपंगत्वाचे शासकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी कोपरगाव येथे येण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी वाहनाची मोफत व्यवस्था करणार असल्याचे त्यांनी यावेळी संगितले.

               याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचाराष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, पंचायत समिती सदस्य अनिल कदम, दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल, सुनील फंड, मनसेचे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड आदींसह दिव्यांग बंधू-भगिनी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments