आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

पंचायत समितीच्या प्रांगणात कर्मवीर शंकररावजी काळे यांचा पुतळा उभारणार – कारभारी आगवण

 पंचायत समितीच्या प्रांगणात कर्मवीर शंकररावजी काळे यांचा पुतळा उभारणार

– कारभारी आगवण

               कोपरगाव प्रतिनिधी :- शेतीसहकार,शिक्षण क्षेत्रात अजोड योगदान देणाऱ्या व पाणी प्रश्नासाठी स्वत:ला वाहून घेणाऱ्या कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांचा पुतळा पंचायत समितीच्या प्रांगणात उभारला जावा अशा आशयाच्या मागणीचे निवेदन कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाकडून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांना देण्यात आले होते. त्या मागणीला पंचायत समिती प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत पंचायत समितीच्या प्रांगणात कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांचा पुतळा उभारण्यास परवानगी दिली असल्याची माहिती कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण यांनी दिली आहे.

               अहमदनगर जिल्ह्याचे भूषण असलेले माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजहितासाठी व्यतीत करून राजकारणातून समाजाचे हित कसे जोपासले जावू शकते याचा आदर्श वस्तुपाठ राज्याला दाखवून दिला आहे. सलग १० वर्ष जिल्हा परिषदेचा कार्यभार पाहताना त्यांनी संपूर्ण जिल्हयात सहकाराच जाळ विण सहकारातून वेगवेगळया संस्था निर्माण केल्या.१९७५ साली रयत शिक्षण संस्थेची जबाबदारीआल्यानंतर १९७५ ते १९९० या १५ वर्षात चेअरमनपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडून खेड्यापाड्यात शाळा, महाविद्यालय उभारून रयत शिक्षण संस्थेचे जाळे विणले. दोनदा आमदार होवून शिक्षण राज्यमंत्री झाल्यानंतर मनात आणलं असत तर स्वत:चे विद्यापीठ निर्माण करून शिक्षण सम्राट सहज होवू शकले असते मात्र त्यांनी कष्टकरी, शेतकरी व गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी स्वत:ला वाहून घेतलं.वयाच्या ३२ व्या वर्षी कोळपेवाडी सारख्या ग्रामीण भागात सहकाराच्या माध्यमातून भारतातील नव्हे तर आशिया खंडातील दुस-या क्रमांकाचा सहकारी साखर कारखाना उभारून या परिसरातील शेतक-यांना व तरुणांना उद्योग व्यवसायाची संधी निर्माण करून देवून शेती आणि सहकारी चळवळीलाही दिशा दिली. १९५२ पासून एका व्यापक कालपटावर अहमदनगर नव्हे; तर संपूर्ण महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात ते महत्वाचे शिल्पकार आहेत. स्वातंत्र्योत्तर ग्रामीण जीवनाशी निगडीत असणाऱ्या सहकार, शिक्षण, शेती, समाजकारण व राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केलेले आहे. अशा निस्वार्थी समाजकारणी व्यक्तिमत्वाचा पुतळा पंचायत समितीच्या प्रांगणात उभारण्यासाठी पंचायत समिती प्रशासनाने संमती दिल्याबद्दल कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण यांनी आभार मानले आहे.

Post a Comment

0 Comments