Vardhapan bannr

Vardhapan bannr

आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh

पूरग्रस्त कोकणवासियांना कोपरगाव तालुका मराठा उद्योजक लाॅबी कडून मदत रवाना.

 पूरग्रस्त कोकणवासियांना कोपरगाव तालुका मराठा उद्योजक लाॅबी कडून मदत रवाना.
कोपरगाव प्रतिनिधी:----

कोकणवासीयांना अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराच्या संकटात एक मदतीचा हात म्हणून मराठा उद्योजक लॉबी कोपरगाव तालुका टीम कडून जीवनावश्यक वस्तू,किराणा व इतर दैनंदिन वापरातील आठ दिवस पुरेल इतके साहित्याचे संच तयार करून वितरणासाठी श्री साईबाबा तपोभूमी मंदिर येथून रवाना करण्यात आले. 

जीवनावश्यक किराणा सह जीवनावश्यक वस्तू सर्व सामग्री एकत्रित संकलित झाल्यावर सर्व मराठा उद्योजक लॉबी चे सदस्यांनी एकत्र येत दि.४ ऑगस्ट रोजी श्री साईबाबा तपोभूमी मंदिर येथून जिल्हा बँकेचे संचालक विवेक भैया कोल्हे , माजी नगराध्यक्ष मंगेश  पाटील यांच्या शुभहस्ते  मदत कार्य वाहनांची पूजा करून व श्रीफळ वाढवून सदर वाहन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रवाना करण्यात आले. यावेळी *मराठा उद्योजक लॉबी जिल्हाध्यक्ष संतोष कुटे, जिल्हा संपर्कप्रमुख राहुल आढाव, जिल्हा महिला सहसंपर्कप्रमुख रविजा पिंगळे* बाळासाहेब देवकर , वैभव आढाव यांचेसह मराठा उद्योजक लॉबी चे सदस्य उपस्थित होते.कोपरगांव तालुक्यातील मराठा उद्योजक लॉबीने माणुसकीच्या भावनेतून एकत्र येऊन दिलेल्या मदतीचे कौतुक होत आहे.

यावेळी उपस्थित असलेले जिल्हा बँकेचे संचालक विवेक भैया कोल्हे यांनी सर्वांचे कौतुक केले व अश्या चांगल्या कामासाठी सदैव या सर्वांच्या माघे नेहमी उभे राहू असे म्हणाले.    

*तसेच  माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील* बोलताना म्हणाले की, कठीण प्रसंगातून घेऊ उभारी कारण आमचे आदर्श राजे शिवछत्रपती  या वाक्याप्रमाणे आज शिवछत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन कोरोना मुळे झालेल्या लॉकडाऊनच्या कठीण काळातही  पूरग्रस्त भागातील संकटात सापडलेल्या नागरिकांसाठी मराठा उद्योजक लॉबीने ही मदत गोळा करून त्यांना माणुसकीचा जो हात दिला त्याबद्दल सर्व मराठा उद्योजक लॉबीच्या सदस्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे, यापुढेही सुख दुःखात,संकटात  असेच सत्कार्य आपल्या हातून घडो अशी या युवकांना सदिच्छा दिल्या.


यासाठी कोपरगाव तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातून मोठी मदत झाली.मराठा उद्योजक लॉबी तील सदस्यांनी त्यांच्या नोकरी व्यवसायातून वेळ काढून सलग चार-पाच दिवस अहोरात्र मेहनत घेऊन ही सामुग्री एकत्रित संकलित केली.


तसेच सदस्य सुशांत आहेर, राहुल गायकवाड ,अनिल शिंदे ,गणेश गायकवाड, सचिन शेळके, गणेश तुळसकर, विकास देवकर, मुकुंद आहेर, प्रतीक दरेकर, ऋषभ कानस्कर, विशाल गायकवाड, शशिकांत गायकवाड, महेश जवाद, प्रशांत आहेर, कैलास आप्पा शिंदे, प्रसाद रुईकर, साई नरोडे, प्रतीक पाटील, जाधव सर, संदीप आहेर, अभिजीत सरोदे, कृष्णा आढाव आदींसह अनेकांनी परिश्रम घेतले.

कोपरगांव तालुक्यातील मराठा उद्योजक लॉबीने माणुसकीच्या भावनेतून एकत्र येऊन दिलेल्या मदतीचे कौतुक होत आहे. जिल्हाअध्यक्ष संतोष कुटे व संपर्क प्रमुख राहुल आढाव यांचे सह सर्व सदस्य पुरग्रस्त भागात मदत करण्यासाठी सर्वे जन रवाना झाले.

Post a Comment

0 Comments