नामको कालवा खोपडीच्या प्रकल्पबाधितांना २ कोटी १७ लाख भरपाई -आ.आशुतोष काळे
कोपरगाव प्रतिनिधी:---- कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक वर्षांपासूनचाप्रलंबित असलेला नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्याच्या वितरिका क्र. १ व २ च्या भूसंपादनाच्या मोबदल्याचा प्रश्न केलेल्या पाठपुराव्यातून मार्गी लागला असून मागील महिन्यात लौकी येथील जमिनी अधिग्रहीत करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना यापूर्वी ६१,८७,०००/- रुपयांची भरपाई मिळाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांना देखील भरपाई मिळवून देणार असल्याचे त्यावेळी सांगितले होते. त्यासाठी सुरु असलेल्या पाठपुराव्यातून खोपडी येथील एकूण २२ प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना २ कोटी १७ लाख रुपयांची भरपाई मिळाली आहे अशी माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्याची निर्मिती झाल्यापासून कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्याच्या वितरिका क्र. १ व २ च्या भूसंपादनाच्या मोबदल्याचा प्रश्न प्रलंबित होता. शेतकऱ्यांच्या अधिग्रहीत केलेल्या जिमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेवून वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्याच्या सर्व अधिकारी, भु-संपादन अधिकारी यांची संयुक्त बैठक घेवून येणाऱ्या अडचणी दूर केल्या होत्या. त्यामुळे या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या अधिग्रहित करण्यात आलेल्या जीमिनीची २०१३ च्या सुधारित जमीन अधिग्रहण कायद्यानुसार भरपाई मिळण्यास सुरुवात झाली आहे. एकूण प्रकल्पबाधितांपैकी मागील महिन्यात लौकी येथील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना ६१,८७,०००/- रुपयांची भरपाई मिळाली आहे. मंगळवार (दि.१०) रोजी एकूण २२ प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या जमिनीची खरेदी करण्यात आली असून त्यांना २ कोटी १७ लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले आहेत.आजपर्यंत २ कोटी ७८ लाख रुपयांची भरपाई या शेतकऱ्यांना मिळाली उर्वरित शेतकऱ्यांना देखील लवकरच भरपाई मिळवून देणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे. अनेक वर्षापासूनचा प्रश्न सोडवून न्याय मिळवून दिल्याबद्दल घोयेगाव, गोधेगाव, तळेगाव, लौकी, धोत्रे, खोपडी,भोजडे आदी गावातील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.
0 Comments