स्वतःबरोबर समाजाचे भले व्हावे हाच अंतापुर तहाराबाद दिंडीचा उद्देश_ स्नेहलता कोल्हे.
कोपरगाव प्रतिनिधी:---- संकटात मनुष्याला परमेश्वराची आठवण होते, परमेश्वराचा दुवॉ मिळाला की त्याचे जीवन सुखकर होते., पण स्वतःबरोबर समाजाचे भले व्हावे, कोरोना संकट दूर व्हावं ही प्रार्थना घेऊन पोहेगावचे रमेश औताडे व त्यांचे सहकारी गेल्या अनेक वर्षापासून पायी दिंडीने पोहेगाव ते अंतापुर तहाराबाद दावल मलिक देवस्थानला जात असतात ही बाब सर्वांना प्रेरणा देणारी आहे असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सौ स्नेहलता कोल्हे यांनी केले.
पोहेगाव ते अंतापुर तहाराबाद दावल मलिक पायी दिंडीचे कोळपेवाडी मार्गावरील कारवाडी फाट्याजवळ सौ स्नेहलता कोल्हे यांनी पूजन करून आशीर्वाद घेत झेंडा दाखवा त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
प्रारंभी पोहेगावचे माजी सरपंच रमेश औताडे म्हणाले की, मनुष्य भौतिक सुखात अधिक वग्र्य असुन त्याला परमेश्वराचा ध्यास तितकासा महत्त्वाचा वाटत नाही, पण आज जगावर कोरोनाची महामारी आलेकी आहे. परमेश्वरापुढे प्रत्येकजण हात जोडतो आहे. आपली ही पायी दिंडी जनसामान्यांचे कल्याण होऊन मनुष्यावर येणारी प्रत्येक संकटे दूर व्हावी यासाठी आहे. माजी मंत्री शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन दादा कोल्हे, युवानेते विवेक कोल्हे यांच्यासह सर्व ज्ञात-अज्ञात सहकारी बांधवांचे सतत सहकार्य असते याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला. मोरविसचे माजी सरपंच गोरख कोकाटे यांनी आभार मानले.
0 Comments