आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

खेर्डी चिपळूण पुरग्रस्तांना संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे मदत साहित्याचे थेट वाटप


खेर्डी चिपळूण पुरग्रस्तांना संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे मदत साहित्याचे थेट वाटपकोेपरगांव प्रतिनिधी:------ चिपळूण तालुक्यातील खेर्डी पुरग्रस्तांवर कोसळलेल्या दुःखाचा डोंगर काहीसा हलका करण्यांचे काम संजीवनी युवा प्रतिष्ठानचे  अध्यक्ष विवेक कोल्हे व संजीवनी युवासेवकांनी करत त्यांच्यापर्यंत थेट घरोघर जात मदत साहित्याचे वाटप केले.  याभागात साथीचे आजार पसरू नये यासाठी स्वच्छता अभियान राबवत फाॅगींगच्या माध्यमांतुन कीटकनाशक फवारणी देखील केली.

            संजीवनी युवा प्रतिष्ठानच्यiवतीने कोपरगांव तालुकावासियांना पुरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले होते त्याप्रमाणे विविध खाद्यपदार्थ, अंथरूण पांघरूण, पुरूष महिला भगिनींसाठी कपडे, लहान मुलांना स्वेटर, टी शर्ट स्वच्छ, पिण्याचे पाणी आदि दोन ट्रक मदतसाहित्य घेवुन स्वतः विवेक कोल्हे व त्यांचे 50 संजीवनी युवा सेवक मदत कार्यात सहभागी झाले होते.


            खेर्डी चिपळूण भागात विवेक कोलहे यांनी श्रमदान केले. चिखलात घरोघर जात पुरग्रस्त कुटूंबांना आधार दिला. पाउस सुरू असतांनाही थेट मदत पुरग्रस्तांपर्यंत पोहोचविली त्यामुळे अनेकांच्या डोळयात तरळणांरे अश्रु दिसत होते.  या भागात पुराचा तडाखा मोठा होता, अनेक रहिवासीयांच्या घरात पाणी घुसल्यांने अबाल वृध्दांचे हाल झाले. त्यांना वैद्यकिय सेवाही मिळणे दुरापास्त होते त्यासाठी सोबत नेलेल्या वैद्यकिय पथकाद्वारे सेवा दिली.  मदत नव्हे सेवाकार्य या भावनेतुन काम करतांना संजीवनी युवासेवकांचा उत्साह द्विगुणीत झाला होता.  चिखलाची दलदल, सतत सुरू असलेला पाउस, शेकडो किलोमिटर दुर जाउन केलेले कार्य खेर्डी चिपळूणवासियांनी या मदतीबददल समाधान व्यक्त केले.


            याप्रसंगी भाजपाचे कोकण विभाग संपर्क प्रमुख माजी आमदार प्रमोज जठार यांनी समक्ष संजीवनी युवा प्रतिश्ठानच्या मदतकार्यची समक्ष पाहणी केली. घरोघर मदतकार्य वाटप होत असल्यांने विवेक कोल्हे व त्यांच्या संपुर्ण मदत पथकाचे कौतुक केले. या संकट काळात प्रत्यक्ष घटनास्थळी येत धीर दिल्यांने सर्वत्र संजीवनी युवा प्रतिष्ठान व कोपरगांववासियांच्या मदत कार्याची चर्चा करत सरपंच सौ वृंदा दाते, उपसरपंच विजय शिर्के, विजय दाते, ग्रामपंचायत सदस्य विनोद भूरण त्यांचे सर्व सहकारी, ग्रामविस्तार अधिकारी अनिल शिंदे, खेर्डी ग्रामस्थ आदिंनी आभार मानले. या सेवाकार्यात उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, रवि रोहमारे, नाटेगांवचे सरपंच विकास मोरे, वारीचे उपसरपंच विशाल गोर्डे, युवासेवक सिध्दार्थ साठे, रोहित कणगरे यांच्यासह 50 युवासेवक उपस्थित

Post a Comment

0 Comments