आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

लोककल्याण हाच एकमेव आदर्श डोळ्यासमोर ठेवून गौतम बँकेची प्रगतीकडे वाटचाल - आमदार आशुतोष काळे

 लोककल्याण हाच एकमेव आदर्श डोळ्यासमोर ठेवून गौतम बँकेची प्रगतीकडे वाटचाल - आमदार आशुतोष काळे     कोपरगाव प्रतिनिधी:-----  कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे संस्थापक माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी १९७६ साली कोपरगाव तालुक्याच्या ग्रामिण भागातील शेतकऱ्यांची आर्थिक अडचण दूर करण्यासाठी व होतकरू उद्योजक, व्यापारी, लहान मोठ्या व्यावसायिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी गौतम सहकारी बँकेची स्थापना केली. बँकेने प्रतिकूल परिस्थितीत देखील लोककल्याण हाच एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून संचालक मंडळाने बँकेचा कारभार अतिशय उतम व पारदर्शक ठेवल्यामुळेच बँक कोरोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीत देखील प्रगतीपथावर असल्याचे गौरोद्गार आमदार आशुतोष काळे यांनी काढले.
सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या व कोपरगाव तालुक्यासह शेजारील तालुक्यातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची आर्थिक गरजा भागवणा-या गौतम सहकारी बँकेची २०२०-२१ या वर्षाची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार नुकतीच कोळपेवाडी येथील मुख्य शाखेच्या सभागृहात बँकेचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी सभासदांना मार्गदर्शन करतांना आमदार आशुतोष काळे बोलत होते सभेच्या अध्यक्षस्थानी बँकचे चेअरमन बाबासाहेब कोते होते.       
             यावेळी बोलतांना ते म्हणाले की, सहकार कायद्याच्या दृष्टीकोनातून सभासद हा अतिशय महत्वाचा घटक आहे. सभासदांनी बँकेत व्यवहार करून मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवल्या पाहिजे. कर्ज व्यवहार, बँकेने उपलब्ध करून दिलेली लॉंकर या सुविधांचा लाभ घेतला पाहिजे. घेतलेल्या कर्जाचा विनियोग चांगल्या कामासाठी करून कर्ज वेळेत फेडावे. बँकेने या आर्थिक वर्षात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करून कोवीड-१९ चे जागतिक संकट काळात देखील तालुक्यातील आर्थिक ऊलाढालीस मदत केली हे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.बँकेचा कारभार अतिशय चांगला असल्यामुळे बँकेला राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळत असून बँकाच्या एकूण सात शाखांचा कारभार पारदर्शकपणे सुरु आहे. दि.३१ मार्च  २०२१ या आर्थिक वर्षात गौतम सहकारी बँकेच्या ठेवी १००  कोटीच्या पुढे गेल्या असून कर्ज वाटप ६२ कोटीच्या पुढे आहे. गुंतवणूक ४७.६५ लाख असुन २०२०-२१ या आर्थिक वर्षात ३१ मार्च २०२१  अखेर बँकेला ८७.७८ लाख रुपये नफा झाला आहे.बँकेला ऑडीट वर्ग ‘अ’ मिळाला असून सभासदांना लाभांश देण्यास बँक सक्षम आहे परंतु  कोवीड १९ चे अनुपालन व रिझर्व बँकेच्या निकषावर सभासदांना लाभांश देता येत नाही याची खंत आ. आशुतोष काळे यांनी यावेळी व्यक्त केली. 
              सभेच्या अध्यक्षपदाची सुचना दिलीप दवंगे यांनी मांडली त्यास ज्ञानेश्वर सोनवणे यांनी अनुमोदन दिले. यावेळी आर्थिक वर्ष २०२०-२१ या आर्थिक वर्षात निधन झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजलीचा ठराव बँकेचे व्हा.चेअरमन धोंडीराम वक्ते यांनी मांडला.सभेचे सूत्रसंचालन संस्थेचे प्रशासकीय अधिकारी नानासाहेब बनसोडे यांनी केले तर आभार मुख्य कार्यकारी अधिकारी बापूसाहेब घेमूड यांनी मानले. याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सुधाकर रोहोम, सर्व संचालक मंडळ, शरद पवार पतसंस्थेचे चेअरमन राधु कोळपे, सुंदरराव काळे, बँकेचे व्हा. चेअरमन धोंडीराम वक्ते, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, कुक्कुटपालनचे व्हा. चेअरमन विजय कुलकर्णी, कारखान्याचे जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद, पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार पतसंस्थेचे मॅनेजर बाळासाहेब काळे, गौतम सहकारी कुक्कुट पालनचे मॅनेजर सुरेश पेटकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बँकेचे अनेक सभासद आँनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते

Post a Comment

0 Comments