आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

कराटे स्पर्धेत भागचंद माणिकचंद ठोळे स्कूलच्या कुलदीप कोतेचे सुयश.

कराटे स्पर्धेत भागचंद माणिकचंद ठोळे स्कूलच्या  कुलदीप कोतेचे सुयश.
कोपरगाव प्रतिनिधी:--- दिनांक 29 ऑगस्ट 2021 रोजी समता इंटरनेशनल स्कूल कोपरगाव यांच्या वतीने आयोजित, टोकियो ऑलिंपिक 2021 मध्ये असलेल्या 'कतास' या कराटे प्रकारातील स्पर्धेत अहमदनगर, नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यातील 219 मुली - मुलंचा सहभाग घेतला. भागचंद मानिकाचंद ठोळे इंग्लिश मीडियम  स्कूल मध्ये शिकणारा व मागील 6 वर्षापासुन नियमित सराव करणारा कुमार यशदिप कमलेश कोते यांने  सर्व मुलांना मधून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सलग तीन राऊंड जिंकून प्रथम क्रमांक मिळविला. त्याच्या या घवघवीत यशाबद्दल त्याला रोखा 1 हजार रुपये पारितोषिक, ट्रॉफी व प्रमाणपत्र मिळणार आहे.. सदर स्पर्धेत पंच म्हणुन शोतोकॉन कराटे संघटनेच्या सचिव स्नेहल मॅडम तसेच सीनियर प्रशिक्षिका, वर्षा मॅडम अणि वेदश्री मॅडम यांनी काम पाहिले .यशस्वी यशदिप कोते यांचे मा. श्री नगराध्यक्ष विजयराव वाहडणे व सामाजिक कार्यकर्ते श्री. वसंतराव जाधव यांनी अभिनंदन केले, व भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments