मुबंई च्या मायानगरीत मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात कोपरगावचा मराठी माणूस भरत मोरे यांची भरारी.
कोपरगाव प्रतिनिधी:--- आपल्या कोपरगावातील एक लढवय्या छोटासा मराठी माणूस भरत भाऊ मोरे यांनी मराठी चित्रपट क्षत्रातील नामांकित मोठ्या कलाकारांना घेवून , आपल्या गावातील कलाक्षेत्रातील लोकांना संधी देऊन , त्यांच्या नवीन दुसऱ्या “मास्क” या नावाच्या चित्रपटाची शूटिंगची सुरवात कोपरगावातच काल केली , त्याबद्दल भरत भाऊ मोरे व त्यांना खंबीर पने साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी शिवसेनेच्या नगरसेविका सौ.सापनाताई मोरे यांचा सत्कार माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केला.
या चित्रपटाची शूटिंग ची सुरवात काल, कोपरगाव शहरात केली असून २८ आगस्ट परियन्त मोठं मोठ्या कलाकार , अभिनेते संदीप पाठक , प्रसन्न केतकर , हार्दिक जोशी , शाम श्रीवास्तव , राम कतोरे तसेच अभिनेत्री निशा परुळेकर , राधा सागर , कल्याणी चौधरी सह अनेक अभिनेते कोपरगाव मध्ये या शुटींगसाठी आले आहेत, येणार आहे. झी चित्रपट मार्फत हा चित्रपट डिसेंबर मध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.
सध्या भरत मोरे व त्यांच्या ” मास्क ” चित्रपटाची चर्चा पंचक्रोशीत चालू आहे. या कोरोना च्या कठीण काळात ते तरुणांना प्रेरणादायी असे काम करत आहे. तमाम कोपरगाव च्या जनतेच्या वतीने त्यांच्या भावी वाटचालीस मंगेश पाटील यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

![]() |
![]() |
0 Comments