आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

पुढील वर्षी आयटीआय प्रवेश घेणारे विद्यार्थी नवीन इमारतीत प्रशिक्षण घेतील- आमदार आशुतोष काळे

 पुढील वर्षी आयटीआय प्रवेश घेणारे विद्यार्थी नवीन इमारतीत प्रशिक्षण घेतील- आमदार आशुतोष काळे      कोपरगाव प्रतिनिधी:---  मागील पाच वर्षात आयटीआयच्या इमारतीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे आयटीआयसाठी प्रवेश घेतलेल्या विदयार्थ्यांना जुन्याच सोयीसुविधांची उणीव असलेल्या इमारतीमध्ये आपले प्रशिक्षण पूर्ण करावे लागले.  से पाहिले तर इमारत असून सुध्दा जुन्या इमारतीत प्रशिक्षण घ्यावे लागणे हा त्या विद्यार्थ्यांवर क प्रकारचा अन्याय आहे. असा अन्याय यापुढे या विद्यार्थ्यांवर होणार नाही पुढील वर्षी आयटीआयप्रशिक्षणासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी नव्या इमारतीतच आपले प्रशिक्षण घेतील त्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.

                    आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीची सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता आर आर पाटील यांच्या समवेत पाहणी करून काय उपाय योजना करायच्या याबाबत चाचपणी केली. यावेळी त्यांच्या समवेत उपअभियंता प्रशांत वाकचौरे,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूलेनगरसेवक गटनेते विरेन बोरावकेमंदार पहाडेराजेंद्र वाकचौरेयुवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,फकीरमामु कुरेशीदिनकर खरेबाळासाहेब रुईकरबाळासाहेब सोनटक्केगणेश लकारे,धनंजय कहारराजेंद्र जोशीवाल्मिक लहिरे,संदीप कपिलेआकाश डागा आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

            आ.आशुतोष काळे म्हणाले की,शासकीय इमारतींची झालेली दुरावस्था व त्यामुळे नागरिकांना येत असलेल्या अडचणींची दखल घेऊन माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात  कोपरगाव शहरातअनेक शासकीय इमारती उभारून कोपरगाव शहराचे वैभव वाढविले. त्यामुळे या इमारतीत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रशासकीय काम करतांना येत असलेल्या समस्या संपुष्टातयेवून नागरिकांच्या होत असलेल्या गैरसोयी दूर होऊन शासकीय कामे वेळेत होऊ लागली.अशाच इमारतीपैकी एक इमारत ही औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयची इमारतत्यांनी बांधली. आयटीआय प्रशिक्षणासाठीप्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध होवून त्यांना प्रशिक्षण घेतांना कोणत्याही अडचणी येवू नये हा त्यामागे उद्देश होता. मात्र २०१४ नंतर या इमारतीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आजही विद्यार्थ्यांना जुन्याच इमारतीत प्रशिक्षण घेत आहेत. मात्र पुढील वर्षी आयटीआय साठी प्रवेश घेणारे विद्यार्थी नवीन इमारतीत प्रशिक्षण घेतील यासाठी या इमारतीसाठी निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments