विरोधकांनी पोकळ बढायात दोन वर्ष घालवली_ स्नेहलता कोल्हे.
कारवाडी येथे २५ लाख रुपये खर्चाच्या विकास कामांचे लोकार्पण.
कोपरगाव प्रतिनिधी:--- एकीकडे विकासाच्या पोकळ बढाया मारायच्या आणि दुसरीकडे मतदार संघातील पाट पाणी, पिण्याच्या पाण्याच्या योजना, विविध योजनांचे रखडलेले अनुदाने, गोदावरी कालवे दुरुस्ती, समन्यायी पाण्याचे बोकांडी बसवलेले भूत, पीक विम्यi, रस्ते, वीज, आरोग्य, पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या हातून खरीपाची वाया गेलेली पिके, कालव्यi ऐवजी नदीला सोडलेले पाणी, आदि प्रश्न लोंबकळत ठेवायचे. गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडी शासनाने कोपरगावसाठी कुठलेही ठोस काम नाही अशी आपल्या मतदार संघाची अवस्था झाली असून कोरोनाग्रस्तांना उपचारासाठी अन्यत्र दारोदार भटकण्याची वेळ आली असल्याची टीका भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केली.
तालुक्यातील कारवाडी येथील शाळा खोल्या दुरुस्ती, गावासाठी शुद्ध आरो प्लांट, ग्रामपंचायत व अंगणवाडी साठी पेव्हर ब्लॉक, येडुआई सामाजिक सभागृह, विनायक पवार ते सांगळे वस्ती रस्ता कॉंक्रिटीकरण अशा सुमारे 25 लाख रुपये खर्चाच्या विकास कामांचे लोकार्पण स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते गुरुवारी झाले त्याप्रसंगी त्या अध्यक्षपदावरून बोलत होत्या.
प्रारंभी सरपंच रूपाली सागर माळी यांनी प्रास्ताविक केले. उपसरपंच दिगंबर कोकाटे यांनी सामाजिक सभागृह कामांचा आढावा देत संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी आजवर केलेल्या कामांची माहिती दिली. याप्रसंगी कोल्हे कारखान्याचे संचालक मनेष गाडे, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष संभाजीराव गावंड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोकराव आहेर, रामकृष्ण कोकाटे, चंद्रकांत चांदगुडे, विश्वास गाडे, माजी संचालक रघुनाथराव फटांगरे, केदार तनपुरे, हरीश कोकाटे, अनिता आढाव, शुभम वाकळे, शीला पवार, शंकरराव फटांगरे आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापक जी.एस. मंडलिक, के. एस. गायकवाड, प्रशांत खडतकर यांनी कारवाडी परिसरात कोवीड काळात कोरोना योद्ध्यांनी केलेल्या कामाचा गौरव करून संजीवनी युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक युवकनेते विवेक कोल्हे यांच्या संजीवनी कोवीड डेडिकेटेड केंद्र कामाचे कौतुक करत हजारो कोरोनाग्रस्तांना मोफत उपचारासाठी आवश्यक ते बेड, औषधे, रुग्णवाहिका, रक्तपुरवठा, प्राणवायूची मोठ्या प्रमाणात विनामूल्य व्यवस्था उपलब्ध केली त्याबद्दलचा आढावा देत कोरोना योद्ध्यांना सौ स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक, सॅनिटायजर वाटप करण्यात आले.
सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाले की, विरोधक सध्या आमच्याच कामाची उद्घाटने करून श्रेय लाटत आहेत. मतदार संघातील किरकोळ कामांसह अनेक महत्त्वाच्या कामांचा पत्रव्यवहार ठप्प आहे. उजनी उपसा सिंचन योजना, रांजणगाव देशमुख पाणीपुरवठा, कोपरगाव शहर निळवंडे पिण्याच्या पाईप लाईन, अशी कितीतरी प्रश्न प्रलंबित आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारी मोठ्या स्वरूपात असताना महाविकास आघाडी शासनाने गोर गरीब रुग्णांसाठी कुठलीही ठोस योजना आणलेली नाही, अनेक महिला विधवा झाल्या, कित्येक कुटुंबियांचा संसार उघड्यावर पडला, तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासन काळातील अनेक योजना बंद करण्यात आल्या, शेकडो निरपराध रुग्णांना प्राण गमवावे लागले, तर अनेक मध्यमवर्गीयांची आर्थिक परिस्थिती हालाखीची तयार झाली. शहर व ग्रामीण भागातील असंख्य युवक बेरोजगार झाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, जगाव की मराव असा बाका प्रसंग त्यांच्यावर उभा ठाकला. ग्रामीण भागात प्रश्न मोठे असताना बोलघेवडेपणा दाखवायचा अशी विरोधकांची सध्याची अवस्था आहे. राज्यातील महाविकास आघाडी शासन म्हणजे एकमेकांचे रुसवे-फुगवे काढणारे शासन तयार झाले असून शेती शेतकरी आणि गोरगरिबांचे प्रश्नांना कुणी वाली राहिले नाही. शेवटी उपसरपंच दिगंबर कोकाटे यांनी आभार मानले.
0 Comments