Vardhapan bannr

Vardhapan bannr

आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh

मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी केला हात साफ

 मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी केला हात साफ.कोपरगाव प्रतिनिधी:----- कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील भैरवनाथ व जोगेश्वरी  मंदिरातील दानपेटी फोडून दानपेटी व त्यातील रक्कम चोरून नेल्या प्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्या  विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेने पंचक्रोशीतील भाविकात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे .कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे शिवारात  भैरवनाथ व जोगेश्वरी यांचे भव्य व  प्रसिध्द असे मंदिर असुन भक्त गणांची येथे कायम वर्दळ असते.मात्र कोरोनामुळे सध्या मंदिर बंद आहे. याचा फायदा घेत सोमवार दिनांक 9 ऑगस्ट 2021 रोजी च्या रात्री 11 ते  मंगळवार 10 ऑगस्ट च्या सकाळी 7 च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लोखंडी पाईपच्या साहयाने मंदिरात प्रवेश करुन मंदीरातील  10,000/-रुपये किमतीची स्टेनलेस स्टील ची पांढऱ्या रंगाची दानपेटी व  25,000 रुपये रोख रक्कम त्यामध्ये नाणे व काही 50,100,200 रुपये दराच्या नोटा अंदाजे एकूण 35000/रुपये असा मुद्देमाल चोरून नेला असल्याची फिर्याद मधुकर शिवाजी होन वय 47 वर्ष राहणार झगडे फाटा चांदेकसारे  कोपरगाव यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली असुन त्यांच्या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध  गु.र.न.व कलम-l  298/2021  भादवि कलम 379प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स. फौ. एम. ए. कूसारे हे करत आहे.

Post a Comment

0 Comments