Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द, पूरग्रस्तांना मदत द्या. आ. आशुतोष काळेंचे आवाहन

     वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द, पूरग्रस्तांना मदत द्या.

   आ. आशुतोष काळेंचे आवाहन


              कोपरगाव प्रतिनिधी:----  काही दिवसांपूर्वी राज्यातील अनेक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण होवून अनेक कुटुंब उद्धवस्त झाली आहेत. त्यामुळे या कुटुंबाप्रती सामाजिक बांधिलकी जोपासून वाढदिवसाचे कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत अशी माहिती आ. आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

                        आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित दरवर्षी ४ ऑगस्ट रोजी व्वीध सामाजिक उपक्रम राबविले जातात व ह्जारो कार्यकर्ते पुष्पगुच्छ घेवून आ. आशुतोष काळे यांना शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. मात्र राज्यातील काही जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंबांना त्याचा फटका बसून त्या कुटुंबांची अपरिमित हानी झाली आहे. निर्माण झालेली हि परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी शासनाबरोबरच सामाजिक बांधिलकी देखील महत्वाची आहे. माझा वाढदिवस जरी उद्या असला तरी आजपासूनच मला मतदार संघातील अनेक नागरिक फोनद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. मात्र कोरोनाचे संकट अजून मिटलेले नाही. मान्य आहे आपण सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात असली तरी पूरपरिस्थितीमुळे आपल्या बांधवांवर आलेल्या संकट काळात वाढदिवस साजरा करणे उचित नाही. तसेच माझ्या वाढदिवसानिमित्त मी बाहेरगावी असल्यामुळे आपल्या शुभेच्छा देखील स्वीकारू शकणार नाही.

           आपण आजपर्यंत काळे परिवारावर केलेल्या प्रेमामुळे मला नेहमीच सामाजिक काम करतांना प्रेरणा मिळत आहे. आपले शुभेच्छारुपी आशीर्वाद यापुढेही असेच माझ्या पाठीवर ठेवून माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा  फ्लेक्स न लावता व पुष्प गुच्छावर होणारा खर्च टाळून  ह्या खर्चाची रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देवून सामजिक दायित्व पार पाडावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments