आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

काडया आणि खोडया विकासाला सतत बाधा ठरतात -स्नेहलता कोल्हे 1 कोटी 61 लाख रूपये खर्चाच्या जळगांव चितळी रस्त्याचे लोकार्पण.

 


काडया आणि खोडया विकासाला सतत बाधा ठरतात -स्नेहलता कोल्हे

1 कोटी 61 लाख रूपये खर्चाच्या जळगांव चितळी रस्त्याचे लोकार्पण.


कोपरगांव प्रतिनिधी:------- 

विरोधकांच्यi काडया आणि खोडया विकासाला सतत बाधा ठरतात, सत्ता असो अगर नसो पण जीवाभावाच्या माणसांसाठी आपल्या रक्तातील शेवटच्या थेंबापर्यंत काम करून त्यांच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात दाखल केलेले सर्वच प्रस्ताव मार्गी लावून कोपरगांव विधानसभा मतदार संघाचा नांवलौकीक राज्यात वाढविण्यांसाठी शर्थीचे प्रयत्न करू अशी  ग्वाही भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी दिली.

            कोपरगांव मतदार संघातील जळगांव ते चितळी या दर्जोन्नती डांबरीकरण मजबुतीकरण रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन 1 कोटी 60 लाख 51 हजार रूपये खर्चाचे लोकार्पण, भाजपा बुथ संपर्क अभियान, महिला सक्षमीकरण बुधवारी करण्यांत आले त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. बाळासाहेब चौधरी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अध्यक्षस्तानी माजी ग्रामपंचायत सदस्या बेबीताई निर्मळ होत्या. प्रारंभी गंगाधर चौधरी, भाउसाहेब चौधरी यांनी प्रास्तविकात मागील कार्यकाळात पाटपाण्यांच्या आर्वतनाची अडचण आली नाही पण सध्या त्याचा खेळ खंडोबा झाला असुन आम्ही टेलला असल्यांने आमच्या शेपटया सतत कापल्या जातात असे सांगितले.  संपतराव चौधरी म्हणांले की, बाजुला बसलेले चुका करतात आणि त्याची बाधा गांवच्या विकासाला होते.  चिपळूण पुरग्रस्त व कोरोना काळात दिवंगत झालेल्यांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यांत आली.  याप्रसंगी कोरोना योध्दे डाॅ. राजेंद्र शिंदे, सुरेश गवई, मिरा कापरे, मनिशा सिनगारे, सविता कापरे, स्वाती बोरावके, अर्चना साळुंके, सुनिता गिते, सोनाली वैराळ, द्रौपदी शिंदे, मिराबाई काळे, आरती वैद्य, सुनिता साप्ते, अरूणा वानखेडे, अलिमा शेख, पुश्पा आंबड, परवीन शेख, संगिता वैराळ, ग्रामपंचायत सदस्या सुनिता चौधरी, श्रध्दा चौधरी, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गरूड, आण्णासाहेब वाव्हटळे, राजेंद्र चौधरी, गणेश क्षीरसागर, अमोल औताडे, एकनाथ चौधरी, संतोश चौधरी, महेंद्र चौधरी, रोहित चौधरी, दत्तात्रय चव्हाण, जालिंदर वैराळ, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र साळुंके, रमेश बनसोडे, रामदास पवार, मंगेश गायकवाड, रशीदभाई शेख, सुभाश कु-हाडे आदिंचा सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला.

            सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणांल्या की, प्रत्येकाच्या जीवनांत यश-अ ठरलेले असते. गांवगाडा चालवितांना प्रत्येकाला कसरत करावी लागते, गेल्या पाच वर्शाच्या कार्यकाळात आपण प्रामाणिक राहुन जनतेच्या विकासाचे अनेक छोटे मोठे प्रश्न  सोडविले, उर्वरित कामांचे प्रस्ताव शासन दरबारी दाखल केले.  पोष्टमन महणून मंत्रालयातील विकास निधी थेट गांवपातळीवर आणण्यांसाठी सतत संघर्श केला.,पण विकासाचा श्रेयवाद लाटुन चाक फिरवायला आणि नारळ फोडायला भलतेच प्रतिनिधी   आले त्याचे दुःख वाटते. आपल्यात काहीतरी विकासशक्ती असल्यांनेच एका महिलेसाठी सारे विरोध एकवटुन लढले पण हे करत असतांना अनेकांचेच त्यात नुकसान झाले.  राजकारणांत माणसं समजुन घ्यायला वेळ लागतो. आज जळगांववासियांनी मनांचा मोठेपणा दाखवत रस्त्याची कामाची आठवण ठेवत त्याचे लोकार्पण आपल्या हस्ते ठेवले त्याचे आत्मीक समाधान आहे.  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज राज्यातील प्रत्येक संकटग्रस्त नागरिकांचे अश्रु पुसुन त्याचे दुःख हलके करीत आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडी शासनांने मराठा आणि ओबीसी समाजाचे आरक्षण घालविले असेही त्या म्हणांल्या. विजय महाराज चौधरी यांनी युवानेते विवेक कोल्हे यांच्या संजीवनी कोविड व डेडीकेटेड आॅक्सीजन सेंटरच्या माध्यमांतुन हजारो कोरोनाग्रस्तांवर मोफत उपचार करून अनेकांना विनामुल्य रूग्णवाहिका व वैद्यकिय सुविधा उपलब्ध करून दिल्याबददल त्यांच्या कार्याचे कौतुक करून आभार मानले. सुत्रसंचलन बाळासाहेब चौधरी व सुभाष जामदार यांनी केले.


Post a Comment

0 Comments