आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

दर्जेदार रस्ते हि काळाची गरज – आ. आशुतोष काळे

  दर्जेदार रस्ते हि काळाची गरज – आ. आशुतोष काळे



            कोपरगाव प्रतिनिधी:---- दळणवळणाच्या साधनांसाठी रस्ते नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा मुद्दा असून ग्रामीण भागाचा विकास साधायचा असेल तर दर्जेदार रस्ते असणे हि काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

कारवाडी येथे रा.मा. ७ ते कारवाडी जिल्हा परिषद शाळा पर्यतच्या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमीपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते होते.  

          पुढे बोलतांना ते म्हणाले की, मतदार संघातील अनेक रस्ते दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक रस्ते माजी आमदार अशोकराव काळे यांच्या कार्यकाळात झाले आहे. त्यानंतर हे रस्ते दुर्लक्षित राहिल्यामुळे त्या रस्त्यांचा विकास खुंटला होता. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून अनेक रस्त्यांसाठी निधी मिळविला असून रस्त्यांची कामे सुरु आहेत.नागरिकांनी रस्त्याच्या बाजूने साईड गटार राहतील याची काळजी घ्यावी जेणेकरून रस्ता खराब होणार नाही यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले यावेळी पंचायत समितीच्या सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन चांदगुडे, अशोक तिरसे, काकासाहेब ताम्हाणे, वसंतराव दंडवते, राहुल जगधने, सरपंच रुपाली माळी, उपसरपंच दिगंबर कोकाटे, भिकाजी सोनवणे, दिलीप पायमोडे, श्रीराम राजेभोसले, देवराम गावंड, अशोकराव मोरे, विक्रम कोकाटे, रोमेश बोरावके, नामदेव खुळे, प्रदीप जाधव, किसनराव सोनवणे, निरंजन बनकर, अनिल खरे, सचिन क्षिरसागर, अभियंता उत्तमरावजी पवार, राजेंद्र दिघे साहेब आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments