आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

पाणीचोरांचे पडद्याआड राहून हास्यास्पद आरोप-- नगराध्यक्ष विजय वहाडणे.

 पाणीचोरांचे पडद्याआड राहून हास्यास्पद आरोप-- नगराध्यक्ष विजय वहाडणे.


कोपरगाव प्रतिनिधी:----- स्वताहा मध्ये धमक नसल्याने हक्काचे नगरसेवकांच्या नांवाने हास्यास्पद आरोप करू नका. अशी जोरदार टीका नगराध्यक्षष विजय वहाडणे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे कोपरगावसाठी आवर्तन मिळावे यासाठी 1 महिन्यापासून प्रयत्न सुरू आहेत.मागील महिन्यात जलसंपदा विभागाला लेखी पत्र पाठविण्यात आले,त्यानंतरही दोन वेळा स्मरण पत्र पाठविले.पण धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्याने धरणात पाण्याची आवक कमी आहे असे लेखी उत्तर कोपरगाव नगरपरिषदेला आले.तरीही लवकरात लवकर आवर्तन मिळावे यासाठी प्रयत्न सुरूच आहेत.
            गोदावरी डाव्या कालव्यातून पाणी चोरणाऱ्यांना माझ्यावर आरोप करायची संधीच मिळालेली आहे. राज्यात व केंद्रातही भाजपाची असूनही  व स्वतः आमदार असतांना त्यांनी काय दिवे लावले? मी तरी नोव्हेंबर 2018 मध्ये दिल्लीत जाऊन ना.नितीनजी गडकरी यांचे माध्यमातून  समृद्धी महा मार्गाचे काम करणाऱ्या "गायत्री कंपनीला 5 नं.साठवण तलावासाठी खोदकाम सुरू  करायला लावले.
पण पदाचा गैरवापर करून तुम्ही तेही बंद पाडले.पण  जनतेच्या सुदैवाने विधानसभा निवडणुकीत तुमचा पराभव झाला व आ.आशुतोष काळे यांच्या सहकार्याने ते खोदकाम पुन्हा सुरू झाले.सध्या काँक्रीटचा 5 नं. साठवण तलावाच्या तांत्रिक मान्यतेची प्रक्रिया सुरू आहे.कोल्हे घराण्यात 40 वर्षे आमदारकी असतांना हे तुम्हाला का जमले नाही?पूर्वी  23 दिवसाआड पाणी देणारे तुम्हीच ना? गेल्या साडेचार वर्षात जनतेला हंडे-मडके घेऊन पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ मी येऊ दिलेली नाही. मेनलाईनवर नळ कनेक्शन देणारे तुमचेचअनुयायी.त्यापैकी काहींचे पाणी कमी केलंय,बाकीच्यांचेही पाणी कमी करण्याचे काम सुरू आहे.कोल्हे गटाचे काही नगरसेवक तर व्हॉल्व्हमनला दमबाजी करून जास्तवेळ पाणी द्यायला सांगतात  व त्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो,मात्र नोकरी सांभाळण्यासाठी व्हॉल्वमन त्यांना नकार देऊ शकत नाहीत.सामाजिक कार्यकर्ते श्री.मंटाला यांनी सांगीतल्याप्रमाणे वितरण व्यवस्थेत दोष आहेतच.कारण पुर्वीच्या काही नगराध्यक्ष व नगरसेवकांनी सत्तेचा दुरुपयोग करून स्वतःच्या सोयीनुसार व्हॉल्व्ह बसवून घेतल्याने पाण्याचा अपव्यय होतो.त्यात बदल करणे सुरू आहे.पाच वर्षे पाणी पुरवठा समिती ताब्यात असूनही निष्क्रिय रहाणारा कोल्हे गट आज निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बरळत आहे.
             नगरपरिषद पाणी पुरवठा समितीही तुमच्याच ताब्यात,सौ.सुवर्णाताई सोनवणे याच सभापती,तुमचेच बहुमत.आरोप मात्र माझ्यावर.तुमच्या प्रथेनुसार तुम्ही हक्काच्या सोनवणे ताईंच्या नांवाने  माझ्याविरुद्ध बातमी दिली,हे जनतेला माहित आहे..42 कोटींच्या पाणी योजनेतून कुणी किती ओरबाडले? हेही बाहेर येणारच आहे.तुम्ही निळवंडेच्या पाण्याची पुंगी वाजविली तरी मतदारांना गुंगी न आल्याने तुम्हाला घरी बसावे लागले,यामुळे कुणाची चिडचिड सुरू आहे हे जनता जाणते.
              स्वतःच्या प्रभागातील कामे करण्यासाठी ठराव मंजूर केले म्हणजे जनतेवर उपकार नव्हेत.पण शहरातील मोक्याचे रस्ते होऊ नयेत यासाठी मे.उच्च न्यायालयातून स्थगिती आणणारे काय लायकीचे आहेत हे जनतेला कळते.मी कुणाचे बाहुले होऊ शकतो का हे मा.आ.कोल्हे साहेबांना विचारून घेतले तर बरे होईल.
           महत्वाचे सण असतांनाही नागरिकांना पाणी टंचाईमुळे होत असणाऱ्या त्रासाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पाण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू आहेत,सहकार्य करावे ही विनंती आहे असेही प्रसिद्धीपत्रकात शेवटी नमूद केले आहे




Post a Comment

0 Comments