आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसा निमित्त कोपरगावात शिवसेना शाखांचे उद्घाटन.

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसा निमित्त कोपरगावात शिवसेना शाखांचे उद्घाटन.



कोपरगाव प्रतिनिधी:---

२७ जुलै शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस हजारो शिवसैनिक या दिवशी मातोश्रीवर शुभेच्छा देण्यासाठी येतात राज्यासह देशभरात सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील आणि देशातील तमाम शिवसैनिकांना आवाहन केले आहे की माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज, फलक लावू नका,त्याऐवजी मी दिलेले "गाव तेथे शिवसेनेची शाखा" हा कार्यक्रम जोरात राबवा. गावागावात शिवसेनेचे फलक उभारा त्यावर भगवे झेंडे डौलाने फडकू द्या.

पक्षप्रमुखांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कोपरगाव शिवसेनेच्या वतीने शहरातील निवारा, हनुमाननगर व खडकी भागात जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनखाली व शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांच्या नेतृत्वाखाली जेष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते शाखांचे उद्घाटन करण्यात आले. विधानसभा संघटक अस्लम शेख व एसटी कामगार सेनेचे शहरप्रमुख भरत मोरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न शिवसेनेच्या माध्यातून सोडविण्यासाठी तसेच पक्षाचे काम घराघरात पोहोचवण्यासाठी व संघटन वाढविण्यासाठी मार्गदर्शन केले. जेष्ठ शिवसैनिकांनी केलेल्या संघर्षामुळेच आज शिवसेना कोपरगावात टिकून आहे असे मत शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांनी व्यक्त केले. सर्व शाखा प्रमुखांचे व पदाधिकाऱ्यांचे सत्कार या प्रसंगी करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक सतिष देशपांडे, विजूनाना मुंगसे, गणेश जाधव, दिलीप उगले, दिगंबर गवळी, शिववाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख इरफान शेख, अमजद शेख, उपशहरप्रमुख विकास शर्मा, गगन हाडा, गोपाळ वैरागळ, आकाश कानडे,संघटक बाळासाहेब साळुंके, विशाल झावरे, ग्राहक संरक्षण कक्षाचे राहूल देशपांडे, सतीश शिंगाने, विभागप्रमुख मयुर दळवी,समीर शेख, अक्षय वराडे, प्रमोद बोथरा, गौरव गुप्ता, निशांत झावरे, मंगेश देशमुख, अभिषेक जाधव, गोविंद चव्हाण,शाखाप्रमुख उमेश छुगणी, वैभव हलवाई, मुनीर शेख, उपशाखाप्रमुख सलमान शेख, चेतन शिरसाठ, निलेश पवार,योगेश उशिरे,विकी चव्हाण, करण सोळसे, राहूल आवारे, करण सोनवणे, सागर महाजन, विक्रांत खर्डे, विशाल कांगणे, नयन पवार, नदीम शेख, मोबिन शेख, रविंद्र पवार,रितेश राऊत,वेदांत कर्पे,साई हलवाई, ओम साळुंके आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments