आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

२०१९ च्या निवडणुकीतील पराभव मा. आ. कोल्हे आजही पचवू शकल्या नाही कोपरगावच्या विकास कामांना न्यायालयातून स्थगिती, महाराष्ट्रातील पहीलीच घटना ---- सुनील गंगुले.

 २०१९ च्या निवडणुकीतील पराभव मा. आ. कोल्हे आजही पचवू शकल्या नाही

  कोपरगावच्या विकास कामांना न्यायालयातून स्थगिती, महाराष्ट्रातील पहीलीच घटना

                         ----  सुनील गंगुले.

            


    

कोपरगाव प्रतिनिधी:----  कोपरगाव शहरातील विकास कामांना चक्क उच्च न्यायालयातून स्थगिती आणण्याची घटना कोपरगाव पालीकेच्या इतिहासात प्रथमच सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी घडवून आणली असून हि महाराष्ट्रातील पहिलीच घटना असल्याची टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी केली आहे.

            कोपरगाव शहरातील विकासकामांना कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी वेळोवेळी सभागृहात विरोध करून विकासकामे होवू द्यायची नाही असा चंग बांधला होता. त्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक, नगराध्यक्ष विजय वहाडणे व शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून विकासकामांना मंजुरी मिळावी अशी मागणी केली होती. त्या मागणीवरून जनहिताचा विचार करून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्यांच्या विशेष अधिकारात ३०८ /१ या कलमाअंतर्गत शहरातील जनहिताच्या विकासकामांना मंजूरी दिली. त्यानुसार शहरात विकासकामे देखील सुरु झाली होती. मात्र सत्ताधारी गटाच्या विद्यमान उपनगराध्यक्षांनी शहरातील या २८ कामांना उच्च न्यायालयातून स्थगिती मिळविली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरविकासात खिळ घालणाऱ्या कोल्हे गटाच्या नगरसेवकांचा निषेध करण्यासाठी  राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना,मनसे व कॉंग्रेस पक्षाच्या वतीने व त्यांच्या नगरसेवकांच्यावतीने शहरातील गौतम बॅंकेच्या सभागृहात पञकार परिषद घेवून कोल्हे गटाचा निषेध व्यक्त केला याप्रसंगी सुनील गंगुले बोलत होते.

                        यावेळी पत्रकारांशी वार्तालाप करतांना गंगुले म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोपरगाव शहरातील मतदारांनी आमदार आशुतोष काळे यांना भरभरून मतदान दिल्यामुळे मा. आ. स्नेहलता कोल्हे यांचे कोपरगाव शहरासाच्या विकासासाठी योगदान न देता निवडून येण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. निवडणुकीत जय पराजय होत असतात. निवडणुकीतील पराभव खिलाडूवृत्तीने स्वीकारायचे असतात मात्र कोल्हे आपला पराभव आजपर्यंत विसरल्या नाहीत.त्यांच्या मनात पराभवाचे शल्य आजही कायम आहे. त्यामुळे कोपरगाव शहरातील जनतेवर सूड घेण्याच्या उद्देशातून त्यांच्या नगरसेवकांनी विकासकामांना स्थगिती मिळविली हि शहरवासीयांच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.बहुमताच्या जोरावर शहराच्या विकासात खोडा घालण्याचे पाप सत्ताधारी गटाचे नगरसेवक करीत आहेत. आमदार आशुतोष काळे निवडून आल्यापासून त्यांच्या मदतीने दोन वर्षांपासून नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शहरात विकास कामांचा सपाटा लावला आहे. त्यामुळे कोल्हे गटांच्या नगरसेवकांची बोलती बंद झाली आहे. येणाऱ्या निवडणुकीत आमदार आशुतोष काळे व नगराध्यक्ष वहाडणे यांना श्रेय मिळेल या भीतीपोटी विकास कामांना आडकाठी आणत आहे. मात्र खालच्या पातळीवर जाऊन विकासकामांना विरोध करणाऱ्यांना आगामी निवडणुकीत जनता त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही असे गंगुले यांनी ठणकावून सांगितले.यावेळी ॲड.विद्यासागर शिंदे यांनी या प्रकरणाची कायदेशीर बाजू मांडताना सांगितले कीशहरातील २८ विकास कामात वैयक्तीक कोणाचा फायदा नसुन तो सर्वसामान्य जनहिताचा फायदा आहे. विद्यमान कोल्हे गटाच्या उपनगराध्यक्षांनी  जरी उच्च न्यायालयातून या कामांना तांञिक चूक काढून स्थगिती आणली तरी वरिष्ठ न्यायालयात जावून ही स्थगिती उठवणार आहे. येत्या २३ जुलै २०२१ रोजी मुख्याधिकारी,जिल्हाधिकारी व संबधीत इतरांना आपली बाजू मांडण्याची तारीख दिली असल्याची माहिती दिली.

            या पञकार परिषदेच्यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनिल गंगुलेशिवसेनेचे शहरप्रमुख कलविंदरसिंग डडियालकॉंग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष तुषार पोटे, मनसेचे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड,संतोष गंगवालगटनेते विरेन बोरावकेनगरसेवक मंदार पहाडे,सुनील शिलेदार,संदीप पगारे,मेहमुद सय्यदराजेंद्र वाकचौरे, फकिर मेहमद कुरेशी, दिनकर खरे, धरमशेठ बागरेचा, ॲड. विद्यासागर शिंदेभरत मोरेप्रफुल शिंगाडे, इरफान शेख, योगेश गंगवाल, यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

                

चौकट:---- मागील साडेचार वर्षाच्या काळात सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी पाशवी बहुमताच्या जोरावर फक्त आणि फक्त शहरविकासाला विरोध करायचे काम केले आहे. जनतेला अपेक्षित असलेला विकास करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष अधिकारात विकासकामे करण्यास मान्यता मिळविली. मात्र शहराचा विकास होवूच द्यायचा नाही अशी मानसिकता असलेल्या कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी कोपरगावच्या सुरु असलेल्या विकास कामांना न्यायालयातून स्थगिती मिळविली. यावरून माजी आमदार कोल्हेंचा शहरातील जनतेवरचा राग अजून गेलेला नसल्याचे दिसून येत असून सुज्ञ नागरिक याचा नक्की विचार करतील.- विरेन बोरावके

Post a Comment

0 Comments