मुख्य रस्त्यांबरोबरच वाड्यावस्त्यांच्या रस्त्यांचा देखील विकास करणार ---- आमदार आशुतोष काळे
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी --- दळणवळणाच्या दृष्टीने मतदार संघातील सर्वच मुख्य रस्त्यांचा विकास करण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नातून कोट्यावधी रुपयांचा निधी मुख्य रस्त्यांसाठी मिळविला आहे. नागरिकांना मुख्य रस्त्यांपर्यंत जाण्यासाठी वाड्यावस्त्यांवरचे रस्ते देखील विकसित होणे गरजेचे असून त्यासाठी मुख्य रस्त्यांबरोबरच वाड्यावस्त्यांच्या रस्त्यांचा देखील विकास करणार असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.
आमदार आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात आलेल्या निंबाळकर वस्ती ते जुने गावठाण रस्त्याच्या खडीकरण कामाचे लोकार्पण तसेच खिर्डी गणेश येथे आमदार आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात आलेल्या भास्कर वस्ती जिल्हा परिषद शाळा ते लोणार वस्ती रस्ता खडीकरण कामाचे लोकार्पण आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, मतदार संघाचा विकास साधण्यासाठी सर्व रस्त्यांचा विकास होणे गरजेचे आहे. मुख्य रस्त्यांना जोडणारे गावागावातील व वाड्यावस्त्यांवरचे रस्ते विकसित झाल्यास नागरिकांच्या अडचणी कमी होणार आहे. त्या दृष्टीने रस्त्यांसाठी अधिक निधी कसा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथे आदिवासी नागरिकांना तसेच कोळगाव थडी, कोळपेवाडी या गावातील अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी नियमित वापर असलेल्या रस्त्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी निधी देऊन या रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. तसेच खिर्डी गणेश येथे देखील भास्कर वस्ती जिल्हा परिषद शाळा ते लोणार वस्ती या परिसरात राहणाऱ्या नागरिकांची अनेक वर्षापासूनची रस्ता व्हावा अशी मागणी होती मात्र ती मागणी पूर्ण झालेली नव्हती. त्या रस्त्यासाठी देखील आमदार आशुतोष काळे यांनी निधी देऊन या रस्त्याचा प्रश्न सोडविला आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करून आमदार काळे यांचे आभार मानले.
यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, कारभारी आगवन, बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र निकोले, कोळगाव थडीच्यासरपंच मीनल गवळी, उपसरपंच सुनील चव्हाण,खिर्डी गणेशच्या सरपंच सौ. सरला चांदर,माधवराव जाधव, बाबुराव निंबाळकर, नानासाहेब रोहोम,वसंतराव लोखंडे, संजयजी लोखंडे, दिलीपराव भास्कर, रामदास केकाण, रवींद्रजी चिंचपुरे, डॉ. कणसे, अमित चिंचपुरे, विक्रम भास्कर, कैलास लूटे,राजेंद्र गवळी, चंद्रशेखर गवळी, नंदकिशोर निंबाळकर, विलास निंबाळकर, दिनकर वाकचौरे,संजय चव्हाण, सोमनाथ चव्हाण, मोहन गायकवाड,हुसेन शेख, शफीक शेख, ग्रामसेवक भानुदास दाभाडेमिलिंदजी लोखंडे, अभिजितजी लोणारी, बाळासाहेब कणसे, विनोदजी तांबे, विजयजी लासुरे, मनोजजी आहेर, पंचायत समिती शाखा अभियंता लाटे,अभियंता दिघे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments