Vardhapan bannr

Vardhapan bannr

आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh

शासनाच्या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा- आमदार आशुतोष काळे

 शासनाच्या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा- आमदार आशुतोष काळे
कोपरगाव प्रतिनिधी:-----  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन राज्यात कृषीक्रांती घडवून राज्याच्या कृषीविकासाला योग्य दिशादिली. त्यांच्या आदर्श विचारांवर शेतकरी केंद्रस्थानी ठेवून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी राज्याचे महाविकास आघाडी सरकारची वाटचाल सुरु असून शेतकऱ्यांसाठी शासनाकडून ज्या योजना राबविल्या जातात त्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग व पंचायत समिती कोपरगाव यांचे संयुक्त विद्यमाने स्व.वसंतराव नाईक यांची जयंती व कृषी दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी आमदार आशुतोष काळे बोलत होते. पुढे बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, कोरोनाच्या जीवघेण्या महामारीत सर्व व्यवसाय ठप्प होते सर्व काही थांबलेलं होत मात्र बळीराजा थांबला नव्हता. आपल्या जीवाची पर्वा न करता जगाचं पोट भरावं यासाठी शेतकरी आपल्या शेतात राबत होते त्यामुळे शेतकरी सुद्धा कोरोना योद्धे असून शेतकऱ्यांनी नेहमीच समाजाच हित जोपासलं आहे असे गौरवद्गार काढले. यावेळी आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.   

याप्रसंगी सभापती सौ. पोर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोमजी.प.सदस्या सोनाली साबळे, पं.स. सदस्य मधुकर टेके, श्रावण आसने, रोहिदास होन, राहुल रोहमारे, दिलीपराव दाने, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदारराष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, गोदावरी खोरेचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदे, अविनाश निकम, विठ्ठल जावळे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, पंडित वाघीरे, मनोज सोनवणे, बाळासाहेब साबळे, शैलेश आहेर आदींसह शेतकरी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments