Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा घोषित करा - कोल्हे.

 

कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा घोषित करा - कोल्हे. कोपरगाव प्रतिनिधी:------
        
          राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीतील बांधवांनी आपल्या जीवाची पर्वा न करता शंभर टक्के उपस्थिती देत शेतकरीवर्गाकडील माल खरेदी करून  जीवनावश्यक मालाचा पुरवठा केला आहे. तेव्हा कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांना कोरो ना योद्धा घोषित करून त्यांचे लसीकरण तातडीने करावे अशी मागणी भाजपाचे प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
            त्या म्हणाल्या  की, कोरोणा काळात कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रत्येक कर्मचारी व हमाल आदी बांधवांनी बजावलेली सेवा  मैलाचा दगड ठरली आहे.   या सर्व बांधवांनी आपला जीव धोक्यात घालून सर्व नियमांचे पालन करत शेतमाल खरेदीत मोलाची भूमिका बजावली.   या बांधवांनी त्यांच्या जिवाचा विचार केला असता, तर राज्यात सर्वत्र अवघड स्थिती निर्माण होऊन शेतमाल तसाच खळ्यावर पडून राहिला असता,  त्यातून अनेकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असते.   परंतु तसे न करता त्यांनी शेतकरी वर्गास आवाहन करून त्यांच्याकडील शेतमाल बाजार समितीत आणून त्याचे नियोजन चांगल्या प्रकारे हाताळले आहे.   त्यामुळे त्यांची सेवा कौतुकास पात्र असून त्यांना कोरोना योद्धा जाहीर करून त्यांचे लसीकरण तातडीने पूर्ण करण्यात यावे.    

Post a Comment

0 Comments