आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

अकरा गावेही विकासाच्या रडारवर – आ. आशुतोष काळे

 अकरा गावेही विकासाच्या रडारवर – आ. आशुतोष काळे कोपरगाव प्रतिनिधी:--- कोपरगाव विधानसभा मतदार संघाचा लोकप्रतिनिधी म्हणून जो न्याय कोपरगाव तालुक्यातील गावांना दिला जाईल तोच न्याय राहाता तालुक्यातील जी गावे कोपरगाव मतदार संघाला जोडली आहेत त्या गावांना देणार असून हि अकरा गावे देखील विकासाच्या रडारवर आहेत असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी राहाता तालुक्यातील नपावाडी येथे एका कार्यक्रम प्रसंगी केले.

                 कोपरगाव मतदारसंघातील नपावाडी (ता.राहाता) येथे विविध विकासकामांचे लोकार्पण आमदार आशुतोष काळे यांच्या      हस्ते पार पडले. यामध्ये दादासाहेब उगले घर ते तुकाराम वहाडणे घर रस्ता मजबुतीकरण व डांबरी करण करणे, दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत बंदिस्त गटार बांधणे, जलशुद्धीकरण प्रकल्प व गावअंतर्गत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवणे, तसेच एलमवाडी येथे रस्त्याचे लोकार्पण आमदार आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.


              ते म्हणाले की, मला विधानसभेच्या निवडणुकीत निवडून देण्यात कोपरगाव तालुक्यातील इतर गावांप्रमाणे राहाता तालुक्यातील अकरा गावांचा देखील सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे मतदार संघाच्या विकाससाठी निधी मिळवितांना या अकरा गावांच्या विकासाचे मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला असून त्या निधीतून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या कामांना चालना मिळून नागरिकांच्या अडचणी कमी होणार आहे. तरीदेखील यावरच न थांबता या अकरा गावांसाठी जास्तीत जास्त निधी कसा मिळविता येईल यासाठी माझा पाठपुरावा यापुढे देखील सुरूच राहणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.


              यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन सुधाकर रोहोम, गौतम सहकारी बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, रामभाऊ जाधव, सरपंच ज्ञानदेव साळुंके, उपसरपंच दत्तात्रय जाधव, एलमवाडीचे सरपंच शिवाजीराजे साबदे, उपसरपंच सौ. कल्पना चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यशवंत चौधरी, गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब चौधरी, माजी सरपंच अशोकराव धनवटे, राजेंद्र धनवटे, रामकृष्ण वहाडणे, दिलीप चौधरी, गोपीनाथ चौधरी, महेश औताडे, गणेश थोरमोटे, पंडित चौधरी, विकास उगले, दिपक वहाडणे, पोलीस पाटील सौ. योगिताताई धनवटे, खंडेराव वहाडणे, दादासाहेब उगले, काशीनाथ धनवटे, ज्ञानदेव वहाडणे, बाबासाहेब उगले, अण्णासाहेब कोते, राहाता शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष नंदु सदाफळ, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा सरचिटणीस रजनीकांत बोठे, प्रकाश साबदे, अमोल थोरमोठे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments