जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला –आ. आशुतोष काळे
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:--- - जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत ग्रामीण भागातील सुज्ञ मतदारांनी इतिहास घडवत ज्या विश्वासाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य निवडून देऊन विश्वास दाखवला. तो विश्वास सार्थ ठरवून सर्वच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.
वारी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ.सोनाली साबळे यांच्या समाज कल्याण विभागाच्या निधीतून विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, मागील चार वर्षाच्या कार्यकाळात ग्रामीण भागात शाळा खोल्या, अंगणवाडी इमारत, ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा योजना, मुस्लीम कब्रस्थान, स्मशानभूमी, समाज मंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय आदि कामांसाठी कोट्यावधी रुपयांच्या मिळालेल्या निधीतून ग्रामीण भागातील बहुतांशी विकासाचे प्रश्न मार्गी लागले आहेत. हे प्रश्न मार्गी लागत असतांना जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्यांनी केलेला पाठपुरावा उल्लेखनीय असून जिल्हा परिषद अध्यक्षा ना.सौ.राजश्रीताई घुले यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले. यावेळी २० टक्के सेस फंडातून २०२०/२१ या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती,जमाती व इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी २५ कडबा कुट्टी मशीन, १६ इलेक्ट्रिक मोटार, ४५ शिलाई मशीन यासाठी एकूण ११ लाख ३१ हजार तसेच ५ टक्के सेस फंडातून अपंग लाभार्थ्यांसाठी १४ दिव्यांग व्यक्तींना स्वयं रोजगारासाठी पिठाच्या गिरणीसाठी प्रत्येकी १३,०००/- याप्रमाणे १ लाख ८१ हजार , लघु उद्योगासाठी १० व्यक्तींना प्रोत्साहनपर अनुदान प्रत्येकी २०,०००/- याप्रमाणे एकूण २ लाख, औषध उपचारासाठी ११ व्यक्तींना प्रत्येकी २०,०००/- याप्रमाणे २ लाख २० हजार व बहु विकलांग व्यक्तींच्या ११ पालकांना प्रत्येकी २०,०००/- याप्रमाणे २ लाख २० हजार रुपयांचे अर्थसहाय्य तसेच महिला बालकल्याण विभागांतर्गत ४५ विद्यार्थिनींना १ लाख ८० हजारांच्या सायकल वाटप करण्यात येऊन असा एकूण २१ लाख १३ हजार रुपयांचे साहित्य वाटप आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सभापती सौ. पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनाली साबळे,पंचायत समिती सदस्य श्रावण आसने, मधुकर टेके,दाणे पाटील, रोहिदास होन, राहुल रोहमारे, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, गोदावरी खोरेचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदे, विठ्ठल जावळे, अविनाश निकम, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी व लाभार्थी उपस्थित
0 Comments