आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

पीकविमा भरण्यांस मुदतवाढ स्नेहलता कोल्हेंच्या पाठपुराव्याला यश

 पीकविमा भरण्यांस मुदतवाढ स्नेहलता कोल्हेंच्या पाठपुराव्याला यश




कोपरगांव प्रतिनिधी:-----चालु खरीप हंगामात पर्जन्यमान उशीरांने झाल्यांने बहुतांश शेतक-यांनी खरीप पिकांच्या पेरण्यां उशीरा केल्या त्यामुळे त्यांना मुदतीत पीकविम्याची रक्कम भरता आली नाही त्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी कृषीमंत्री दादा भूसे यांच्याकडे केली होती त्या पाठपुराव्याला यश आले असुन खरीप पिकविमा भरण्यांसाठी 23 जुलै पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे तरी जास्तीत जास्त शेतक-यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
           सौ. स्नेहलता कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की, प्रधानमंत्री खरीप पिकविम्याची अंतिम मुदत 15 जुलै पर्यंत होती कोपरगांव विधानसभा मतदार संघात सुरूवातीला मृग नक्षत्राचे अत्यंत कमी पर्जन्यमान झाले, त्यानंतर पावसांने ओढ दिली परिणामी येथील काही शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट आले.  जुलैच्या दुस-या आठवडयात काही ठिकाणी पाउस झाला त्यावर शेतक-यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या परंतु पीकविमा भरण्यांची मुदत निघुन गेल्यांने शेतक-यांना या योजनेपासुन वंचित रहावे लागले त्याबाबत आपण केंद्र व राज्य स्तरावर पाठपुरावा करून खरीप पिकविमा भरण्यांसाठी मुदतवाढ मिळावी म्हणून कृषी मंत्री दादा भूसे व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी करून पाठपुरावा केला होता त्याबाबत केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी गुरूवारी रात्री याबाबतची घोषणा करून राज्य शासनांच्या प्रस्तावास खरीप पिक विमा भरण्यांस मुदतवाढ दिली आहे तेंव्हा शेतक-यांनी याचा लाभ घ्यावा.  त्याचप्रमाणे मागील हंगामातील पिकविम्याची रक्कम मिळावी म्हणून आपला पाठपुरावा सुरू असल्याचेही सौ. कोल्हे शेवटी म्हणांल्या.


Post a Comment

0 Comments