Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

करंजी गावची विकासात घौडदौड_ विवेक कोल्हे.

 करंजी गावची विकासात घौडदौड_ विवेक कोल्हे.


कोपरगाव प्रतिनिधी:--- 

        तालुक्यातील करंजी ग्रामपंचायतीने गावच्या विकासात मोठी घोडदौड घेतली असून 15व्या वित्त आयोगातून घेतलेल्या घंटागाडीचे लोकार्पण करून येथील नेतृत्व रहिवासीच्या सोई सुविधाकडे जाणीवपूर्वक लक्ष देत असल्याचे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक व संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे  यांनी केले.  कोरोना काळात गावातील सर्वच घटकांनी केलेले काम कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले.

            प्रारंभी उपसरपंच रवींद्र आगवण यांनी करंजी ग्रामपंचायतीने केलेल्या विकास कामांची माहिती देऊन कोरोना काळात संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा देत, आत्मा मालिक संजीवनी कोवीड व डेडिकेटेड सेंटर मार्फत उपलब्ध आरोग्य सुविधांमुळे अनेकांचे प्राण वाचल्याचे सांगितले.  सरपंच छबूनाना आहेर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.   याप्रसंगी माजी उपसभापती नवनाथ आगवण, संतोष भिंगारे, डॉ.  सूनील देसाई, डॉ. विलास सोनवणे, चंद्रकांत पवार, अनिल डोखे,  बाळासाहेब भिंगारे, सोमनाथ पाफाळे, शिवाजी करंजकर, माजी सरपंच लक्ष्मण शेळके, ग्राम विकास अधिकारी बाबासाहेब गुंड, नारायण भारती, मच्छिंद्र भिंगारे,  अजय भिंगारे, परदेशी ताई, बाळनाथ जोरवर, रवींद्र पोळ,  देविदास भिंगारे,  शिवसेनेचे शिवाजी जाधव, अरुण भिंगारे, विकास शिंदे आदी उपस्थित होते.  करंजी गावातील अंगणवाडी सेविका, वायरमन, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, उप अभियंते, तलाठी, ग्रामविकास अधिकारी,  ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील, आशा सेविका, आशा वर्कर, अधिकारी व कोवीड योद्ध्यांचा विवेक कोल्हे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. शेवटी देविदास भिंगारे यांनी आभार मानले

Post a Comment

0 Comments