लिलाबाई जाधव यांचे निधन.
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:----- कोपरगाव शहरातील येवला रोड परिसरात राहणाऱ्या कै. लिलाबाई पांडुरंग जाधव (वय ७५) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात एक मुलगा,एक मुलगी, सून,नातवंडे असा परिवार आहे.कै.लिलाबाई जाधव यांनी अतिशय कष्टाने आपला संसार उभा करून आपल्या मुलांना घडवीले होते. तसेच त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक निराधारांना आधार देत मायेची ऊब दिली होतीत्या अतिशय धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या होत्या रमेश पांडुरंग जाधव यांच्या त्या आई तर शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मामी होत. त्यांच्यावर कोपरगाव अमरधाम येथे शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी देवरे जाधव कुटुंबियांच्या नातेवाईकांसह सर्वच क्षेत्रातील मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कै. लिलाबाई जाधव यांचा दशक्रिया विधी चा कार्यक्रम शनिवार ७ ऑगस्ट रोजी कोपरगाव अमरधाम याठिकाणी होणार असल्याची माहिती जाधव कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आली आहे.
0 Comments