सामाजिक संघटनेच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मयूर फाळके यांचा माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या हस्ते सत्कार
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी :------ शहरातील सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असणाऱे युवक मयुर विनायकराव फाळके यांची माहिती अधिकार , पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेच्या कोपरगाव शहर अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्धल त्याचा सत्कार माजी.नगराध्यक्ष. मंगेश पाटील , सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी दुकानदार उमेशराव धुमाळ तसेच किराणा व्यापारी व समता पतसंस्था चे संचालक गुलशन जी होडे यांनी केला..यावेळी मयुर जी यांना या मिळालेल्या अध्यक्ष पदाच्या जबाबदारी च्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मोठी मदत कोपरगावरांना होणार आहे . यावेळी उपस्थितांच्या तर्फ़े नूतन अध्यक्ष याना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
0 Comments