आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

उपनगरातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा – जनार्दन कदम.


उपनगरातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा –  जनार्दन कदम. 
 कोपरगाव प्रतिनिधी:------ प्रभाग क्र. २ येथील निवारा, सुभद्रानगर, जानकी नगर रिद्धीसिद्धी नगर या भागात वारंवार लाईट जाण्याचे प्रमाण वाढल्याने परिसरातील अनेक नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक व्यापारी आदींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत वीज वितरण कंपनी कोपरगावला यापूर्वी १२ एप्रिल २०२१ व ६ जुलै २०२१ रोजी मान.उपकार्यकारी अभियंता कोपरगाव यांना स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत उपनगरातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे निवेदन उपकार्यकारी अभियंता श्री.खराटे यांना देण्यात आल्याचे प्रभाग क्र.२ चे नगर सेवक श्री.जनार्दन कदम यांनी सांगितले.

सर्व स्थानिक नागरिकांच्या वतीने नविन विद्युत रोहित्र बसवुन मिळावी किंवा विद्युत लोड विभागणी व्यवस्थितरीत्या करून मिळवीत यासाठी उपस्थित नागरिकांच्या वतीने देखील जोरदार मागणी करण्यात आली. निवेदन स्वीकारून श्री.खराटे यांनी सांगितले कि, नागरिकांच्या मागणीचा विचार करून १५ दिवसात अंमलबजावणी करण्याची सर्व नागरिकांना ग्वाही दिली. प्रसंगी प्रभाग क्रमांक २ मधील नगरसेवक श्री.जनार्दन कदम तसेच     सतीश जाधव, माजी सैनिक आनंद डिके, श्रीपाद कुलकर्णी, वैभव गिरमे, अमोल राजूरकर, दशरथ सरवान, संतोष बैरागी, विष्णुपंत गायकवाड, आदिंसह परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments