राजकारण बाजूला ठेवून एकत्रित आल्यास गावचा विकास सहज शक्य - आ आशुतोष काळे
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:---- राज्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेवून महाविकास आघाडी सरकार अतिशय चांगल्या प्रकारे काम करीत आहे. अशा प्रकारे प्रत्येक ग्रामपंचायतीने देखील गट तट विसरुण राजकारण बाजूला ठेवून एकत्रित आल्यास प्रत्येक गावाचा विकास करणे सहज शक्य असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.
जिल्हा परिषद वार्षिक योजनेअंतर्गत डाऊच खुर्द येथे बांधण्यात आलेल्या अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण व चांदेकसारे येथे बांधण्यात येणाऱ्या प्राथमिक शाळा इमारतीचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.
ते म्हणाले की, साडेचार वर्षापूर्वीविकास करण्याच्या बाबतीत माझ्यावर विश्वास दाखवून ग्रामीण भागातील जनतेने मोठ्या विश्वासाने दिलेली जबाबदारी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी समर्थपणे पार पाडून संपूर्ण कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. तोच विश्वास विधानसभा निवडणुकीत मतदार संघातील जनतेने पुन्हा एकदा माझ्यावर दाखविला. माझ्यावर दिलेल्या जबाबदारीचे भान ठेवून मतदार संघातील आरोग्य, शिक्षण रस्ते पाणी आणि वीज या प्रश्नांना नेहमीच प्राधान्य देवून या प्रश्नांना दिले आहेत. संपूर्ण मतदार संघाचा प्रतिनिधी या नात्याने मतदार संघाचा अतिशय महत्वाचा गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लावला आहे. वर्षानुवर्षापासून झालेली गोदावरी कालव्यांची दुरावस्था झाल्यामुळे वहनक्षमता कमी होऊन शेतीला वेळेवर आवर्तनाचा लाभ मिळत नव्हता. त्याबाबत जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात ४०० कोटी रुपये गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी मंजूर करण्यात आले असून प्रत्येक वर्षाला १०० कोटी रुपये देण्यात येणार आहे. त्यापैकी चालू वर्षी आजपर्यंत ५५ कोटी रुपये निधी मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. मतदार संघाच्या विकासासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. त्यामुळे प्रत्येक गाव विकासाच्या वाटेवर घेवून जाण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी सभापती पोर्णिमाताई जगधने,उपसभापती अर्जुनराव काळे, सदस्य सौ. अनुसयाताई होन, अनिल कदम, ॲड. राहुल रोहमारे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक आनंदराव चव्हाण, रोहीदास होन, गौतम बँकेचे व्हा. चेअरमन धोंडीरामजी वक्ते,गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदे, सरपंच संजय गुरसळ, उपसरपंच स्वाती रणधीर, संतोष पवार, शंकरराव गुरसळ,पंकज पुंगळ, बालमभाई सय्यद, भास्कररावहोन, शंकरराव चव्हाण, राहुल जगधने,खातीबभाई सय्यद, दिगंबर पवार, सलिम शेख,कल्याण गुरसळ, भगीरथ होन, सुभाष होन,भिमाजी होन, द्वारकानाथ होन, राजेंद्र औताडे,नंदकिशोर औताडे, शंकरराव औताडे, शरद होन, देवेन रोहमारे, सुभाषजी होन, भिमाजी होन, द्वारकानाथजी होन, भास्कर होन, राजेंद्र औताडे, विलास चव्हाण, कर्णा चव्हाण,शंकरराव औताडे, विठ्ठल होन, आर.आर. होन, मोहन गुजर, नूरमोहम्मद शेख, भिमाजी होन, राजाभाऊ होन, भगीरथ होन, दौलतरावहोन, अर्जुन होन, भास्कर होन, डी.जी. शेख,सय्यदबाबा शेख,मधूकर खरात, शरद होन,हसन सय्यद, मतीन शेख, किरण होन,विश्वनाथ होन, रवींद्र खरात, धीरज बोरावके,युनूस शेख, अशोक होन, पंकज होन, सागर होन, दादासाहेब होन, पुंजाजी होन, द्वारकानाथ होन, सुनील खरात, कांतीलाल होन, सचिन होन, किरण पवार, फारुख शेख, मन्सूर शेख,पंचायत समिती गटविकास अधिकारी सचिनजी सूर्यवंशी, उत्तमराव पवार, केंद्रप्रमुख निळे सर, कुलधरण मॅडम, ग्रामसेवक सुकेकरआदि मान्यवर उपस्थित होते.
0 Comments