आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

कोपरगावत काँग्रेस कमेटी आढावा बैठक संपन्न

 कोपरगावत काँग्रेस कमेटी आढावा बैठक संपन्न


कोपरगाव प्रतिनिधी:----  कोपरगाव शहर कॉंग्रेस पार्टी अनुसूचित जाती विभागाची बैठक आदित्य कॉम्पुटर एजुकेशन या ठिकाणी घेण्यात आली. यावेळी प्रदेश समन्वयक शिवाजीराजे जगताप, बंटीभाऊ यादव, महिला जिल्हा अध्यक्षा सौ. साविताताई विधाते, जिल्हा समन्वयक अरुणकाका गावित्रे हे उपस्थित होते. तसेच तालुका अध्यक्ष चंद्रकांत बागुल, शहर अध्यक्ष रविंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी बंटी यादव होते. अध्यक्ष स्थानावरून बोलतांना बंटी यादव म्हटले कि, एकत्रित येवून कामे करा, लोकांच्या समस्या जाणून घ्या, गोरगरिबांच्या हक्कासाठी लढा, आपल्या पाठीशी मा.महसूलमंत्री थोरात साहेब, ऊर्जामंत्री मा.नितीनजी राउत साहेब, मा. आमदार सुधीरजी तांबे साहेब हे आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतील यात कुठलीही शंका नाही. अरुणकाका गावित्रे यांनी आपल्या शैलीत कार्यकर्त्यांनी काम कसे करावे हे ठणकावून सांगितले. तर शिवाजीराजे जगताप, सविता विधाते, यादवराव त्रिभुवन, अब्बुबकर मणियार, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मंगलताई आव्हाड, युसुफभाई शेख, अलत्मश शेख, संजीव पाईक, शेख सर, सतीष साबळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र साबळे यांनी केले तर आभार राजेंद्र घोडेराव यांनी मानले

Post a Comment

0 Comments