रांजणगांव देशमुख प्रादेशिक पाणीपुरवठा योजना चालू आवर्तनात भरून घेऊन तात्काळ कार्यान्वित करावी_स्नेहलता कोल्हे.
कोपरगाव प्रतिनिधी:---
तालुक्याच्या पश्चिम भागातील रांजणगांव देशमुख व ७ गावच्यi प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील किरकोळ त्रुटी दूर करून ही योजना चालू पाटपाण्याच्यi आवर्तनात पूर्णपणे भरून घ्यावी तसेच त्याचा ्याची वीज जोडणी तात्काळ करावी व १७५ अश्वशक्तीच्या दोन विद्युत मोटारींची तात्काळ दुरुस्ती करून ही योजना कार्यान्वित करावी अशी मागणी भाजपाच्यi प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशी देखील बोलणे झाले आहे.
सौ स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाले की, रांजणगाव देशमुख, बहादरपूर, वेस, सोयगाव, अंजनापुर, मनेगाव, व धोंडेवाडी या सात गावांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना असून तिच्या स्वतंत्र फिडरचा प्रश्न तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यकाळात मार्गी लावून ती कार्यान्वित केली होती. गेल्या दोन महिन्यापासून या भागात पर्जन्यमान नसल्यामुळे नागरिकांचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. ही योजना गेल्या सात महिन्यांपासून बंद आहे. वीज मोटारी नादुरुस्त आहे, या समस्येचे निराकरण व्हावे म्हणून बहादरपूरचे माजी सरपंच कैलास रहाणे, वेस सोयगावचे सरपंच अशोक म्हासळसकर, धोंडेवाडीचे सदस्य बाबासाहेब नेहे आणि अंजनापुरच्या सरपंच कविता गव्हाणे, उपसरपंच अशोक गव्हाणे हे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांना सोमवारी भेटले.
तत्पूर्वी सौ. स्नेहलता कोल्हे यांनी चालू पाटपाणी आवर्तनात या योजनेचा तलाव पूर्णपणे पाण्याने भरून घ्यावा व आपत्तीजन्य परिस्थितीत राहता वीज वितरण कंपनीचे उपअभियंता श्री. पाटील यांनी तात्काळ वीज जोडणी करून द्यावी म्हणून मागणी केली ्याच प्रमाणे सात गावच्या हिश्श्याची ठरलेली रक्कम समिती अंतर्गत गठीत केलेले सचिव ग्रामविकास अधिकारी अकबर शेख यांच्याकडे धनादेशाद्वारे जमा करावी म्हणजे त्यातून १७५ अश्वशक्तीच्या वीज मोटारींची दुरुस्ती करावी व गटविकास अधिकाऱ्यांनी याबाबत येणाऱ्या अडचणींचे निराकरण करावे असेही सौ.कोल्हे शेवटी म्हणाल्या. नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांकच्यiही संपर्क साधून रांजणगाव देशमुख पाणी पुरवठा योजनेबाबत माहिती देऊन यातील अडचणी सोडवण्यासाठी संबंधितांना सूचना व्हाव्यात म्हणून सौ. स्नेहलता कोल्हे यांनी पाठपुरावा सुरू ठेवला
0 Comments