आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

शहराच्या विकासासाठी कोपरगाव नगरपरिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसला बहुमत मिळवून द्या. सुज्ञ नागरिक विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती केल्याशिवाय राहणार नाही - आमदार आशुतोष काळे

 शहराच्या विकासासाठी कोपरगाव नगरपरिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसला बहुमत मिळवून द्या.

सुज्ञ नागरिक विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती केल्याशिवाय राहणार नाही - आमदार आशुतोष काळे   कोपरगाव प्रतिनिधी:-----  कोपरगाव शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी नगराध्यक्षांना पाठींबा दिला. मात्र निवडणुकीतील पराभव विसरता येत नसल्यामुळे विरोधकांनी मागील साडेचार वर्षापासून कोपरगाव शहराच्या विकासात आडकाठी घातली आहे. काही महिन्यांपूर्वी शहरातील महत्वाच्या रस्त्यांबरोबरच एकूण २८ कामांना पालिकेच्या सभागृहात विरोधकांनी बहुमताच्या बळावर  विरोध केला. मात्र लोकशाहीच्या मार्गाने विरोधकांना नामोहरम करून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष व शहर विकासाची बांधिलकी असणाऱ्या काही नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून हि कामे मंजूर करून आणली. मात्र  या विकासकामांना विरोधकांनी पुन्हा न्यायालयातून आणलेली स्थगिती शहर विकासासाठी घातक असून शहराच्या विकासासाठी कोपरगाव नगरपरिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसला बहुमत मिळवून द्यावेअसे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले.


                कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा  पदवितरण समारंभ आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडला.याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न सुटू नये त्यासाठी विरोधकांनी पडद्यामाघून ५ नंबर साठवण तलाव होऊ नये यासाठी खोडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र पाच नंबर साठवण तलावाचे काम व्हावे यासाठी मी केलेल्या धरणे आंदोलनाच्या वेळी संपूर्ण कोपरगाव शहरातील जनता माझ्यासोबत होती. मी करीत असलेला संघर्ष व माझे प्रयत्न प्रामाणिक होते याची शहरातील जनतेला खात्री पटल्यामुळे त्यांनी मला विधानसभा निवडणुकीत भरभरून मताधिक्य दिले. त्यातून उतराई होण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कोपरगाव शहरासाठी कोट्यावधी रुपयांचा  निधी आणला आहे व यापुढे देखील आणणार आहे. कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकास व्हावा हि माझी तळमळ आहे. मात्र कोपरगाव नगरपरिषदेत बहुमताच्या जोरावर २८ विकासकामांना न्यायालयातून स्थगिती आणली जाते हि शहराच्या विकासाच्या दृष्टीने दुर्दैवाची बाब आहे. भविष्यात कोपरगाव शहराच्या विकासात अशा अडचणी निर्माण होणार नाहीत. त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला एकहाती सत्ता महत्वाची आहे. आपण करीत असलेले काम जनतेला भावले आहे. त्यामुळे शहरातील जनता विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती केल्याशिवाय राहणार नाही याचा मला विश्वास असून कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कामाला लागावे असे आमदार आशुतोष काळे यांनी पदाधिकाऱ्यांना सूचित केले. शहराध्यक्ष सुनील गंगूले, हाजी मेहमूद सय्यद, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश गवळी, अशोक आव्हाटे, बाळासाहेब रुईकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. 


             यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, हाजी मेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, कार्याध्यक्ष संदीप कपिले, वाल्मिक लहिरे, विद्यार्थी कार्याध्यक्ष निखील डांगे, फकीरमामु कुरेशी, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश गवळी,  डॉक्टर सेलचे अध्यक्ष तुषार गलांडे, मागासवर्गीय सेल अध्यक्ष रावसाहेब साठे, कार्याध्यक्ष प्रकाश दुशिंग, युवक उपाध्यक्ष कृष्णा आढाव, मनोज कडू, सुनील बोरा, बाळासाहेब रुईकर, ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष प्रा.अंबादास वडांगळे, सोशल मिडीया अध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के, सेवादल अध्यक्ष सचिन परदेशी, ओबीसी सेल अध्यक्ष राहुल देवळालीकर, कार्याध्यक्ष संतोष शेलार, विजय त्रिभुवन, राजेंद्र फुलपगार आदींसह सर्व सेलचे अध्यक्ष, पक्षाचे पदाधिकारी, नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


             यावेळी (विद्यार्थी शहराध्यक्ष) कार्तिक सरदार, (सांस्कृतिक तालुकाध्यक्ष) रमेश टोरपे, (उपाध्यक्ष) किशोर डोखे, अमोल गिरमे, राकेश शहा, विलास आव्हाड, शकील खाटिक, (सरचिटणीस) किरण बागुल, दिलीप पोटे, राजू उशिरे, रविंद्र सोनटक्के, शंकर घोडेराव, भाऊसाहेब लोहकरे, (संघटक) विजय बागडे,  विलास ताम्हाणे, रुपेश वाघचौरे, अमोल आढाव, मुन्ना पठाण, जनार्दन शिंदे, रविंद्र चिंचपूरे, राजू ठाकरे, शिवाजी कुऱ्हाडे, राजेंद्र वालझाडे, अल्ताफ पठाण, आक्रम शेख, अनिल परदेशी, कैलास महालकर, (चिटणीस) राजेंद्र राऊत, अशोक सोळसे, शकूर शेख आदी पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते देण्यात आले. नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव शहरातील घराघरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार पोहचवून शहर विकासासाठी आमदार आशुतोष काळे यांचे हात बळकट करण्याचा निर्धार केला.

Post a Comment

0 Comments