आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

बहुचर्चित राजू धिवर खून प्रकरणात चार जण पोलिसांच्या ताब्यात, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची माहिती

बहुचर्चित राजू धिवर खून प्रकरणात चार जण पोलिसांच्या ताब्यात, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची माहिती



शिर्डी येथील राजेंद्र धिवर खून प्रकरणात चार आरोपी समावेत  उपविभागीय अधिकारी संजय सातव पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे पोलीस निरीक्षक अनिल कटके व पोलीस कर्मचारी (छाया किशोर पाटणी)



 शिर्डी प्रतिनिधी:----- शिर्डी शहरातील बहुचर्चित 29 जून रोजी झालेल्या राजू आंतवन धिवर वय ४२ यांच्या खुनात पोलिसांनी चार जणांना  ताब्यात घेतले असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली  यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे उपविभागीय अधिकारी संजय सातव पोलीस निरीक्षक अनिल कटके प्रवीण लोखंडे आदी उपस्थित होते

यावेळी बोलताना जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील म्हणाले की तांत्रिक पुराव्याच्या आधारे ४० सीसीटीव्ही फुटेज च्या अनुषंगाने या खूनाचा तपास सुरू करण्यात आला होता या खुनाचा तपास नाशिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून देखील करण्यात आला होता शिर्डी पोलिसांनी या खुनाच्या प्रकरणात नाशिक पोलिसांची मदत घेऊन  राजु उर्फ चंद्रहास सुभाष उबाळे  वय १९ रा पाथ्रडी रा नाशिक अविनाश प्रल्हाद सावंत वय १९पाथ्रडी रा नाशिक यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता  सदर मयत  धिवर यांचा खून चार लाख रुपये सुपारी देऊन अमोल सालोमन लोंढे वय ३२ राहणार शिर्डी अरविंद महादेव सोनवणे वय १९ राहणार शिर्डी  यांच्या  सांगण्यावरून झाला  असल्याचे सांगितले 

    अधिक माहिती अशी की पोलीस तपासात  सदरचा गुन्हा हसीम खान नालासोपारा ठाणे ,कुलदीप   पंडित राहणार नाशिक,, साहिल शेख राहणार नाशिक, साहिल पठाण राहणार नाशिक, यांनी केल्याचे सांगितले असून या प्रकरणात या चारही जणांचा शोध सुरू असून ह्या खुनाचे आणखी काही कारण आहे का या अनुषंगाने देखील शिर्डी पोलिस प्रयत्न करत असल्याचे सांगून लवकरच या सर्व खुनाचा उलगडा सविस्तरपणे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे  असे  सांगितले बांधकाम मंजूर राजेंद्र धिवर याचा खून झाल्यानंतर शिर्डी शहरात मोठी खळबळ उडाली होती हा खुनाचा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणावा यासाठी देखील त्याच्या कुटुंबीयांचा मोठा पाठपुरावा सुरू होता या खुनाचा  लवकरात लवकर तपास लागला पाहिजे यासाठी नातेवाईकांचा देखील मोठा पाठपुरावा सुरू होता त्या धर्तीवर गेले दहा दिवस शिर्डी पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व शिर्डी पोलिसांचे पथक नाशिक पोलिसांची मदत घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पाठपुरावा करीत होते काल चारही जणांना ताब्यात घेऊन त्यांची कठोर चौकशी शिर्डी पोलिसांनी सुरू केली आहे चार पैकी दोन जणावर  त्यातील राजू उर्फ चंद्रहास सुभाष उबाळे व अविनाश प्रल्हाद सावंत राहणार नाशिक या दोघांच्या विरोधात नाशिक इंदिरानगर पोलीस स्टेशन मध्ये खुनासह  गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल आहे असे समजते सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी  सपोनी सोमनाथ दिवटे दीपक गंधाले  प्रवीण दातरे  बारकू जाणे सुरेखा देवरे  वैभव रुपवते पोलीस कर्मचारी  गणेश इंगळे दत्तात्रय हिंगडे दत्तात्रय गव्हाणे मनोहर गोसावी सुनील चव्हाण विशाल दळवी शंकर चौधरी रवी सोनटक्के दीपक शिंदे सचिन अडबल रवींद्र घुंगासे संदीप चव्हाण संदिप दरंदले रोहित येमुल सागर ससाणे रंणजीत जाधव प्रकाश वाघ राहुल सोळुंके मेघराज कोल्हे  उमाकांत गावडे अर्जुन बडे भरत बुधवंत सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकाची स्थापना करून हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेला होता, , ,

Post a Comment

0 Comments