Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

ॲडव्होकेट योगेश खालकर यांच्या आंदोलनांच्या इशाऱ्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली दखल झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती सुरू

 ॲडव्होकेट योगेश खालकर यांच्या आंदोलनांच्या इशाऱ्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली दखल

झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती सुरू


कोपरगाव प्रतिनिधी:----- अॅडव्होकेट योगेश खालकर यांच्यासह रांजणगाव देशमुख व परिसरातील ग्रामस्थांनी झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख रस्त्या संदर्भात उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देताच निद्रिस्त झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला  उशिरा का होईना जाग आली  गावकऱ्यां सह ॲडव्होकेट खालकर यांच्या जनरेट्या मुळे रस्त्याला पडलेल्या खड्डे   बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. तालुक्यातील अत्यंत दयनीय अवस्था झालेल्या  झगडे फाटा-रांजणगांव देशमुख ह्या खराब झालेल्या अपघातांचे प्रमाण वाढले होते खराब रस्त्यामुळे अनेक वेळा छोटं मोठे अपघात झाले अपघातामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे या रस्त्यावरून 24 तास रहदारी मोठ्या प्रमाणात चालते तसेच बाह्यवळण व संगमनेर ला जाणारा रस्ता असल्याने या रस्त्याला विशेष असे महत्त्व आहे या मोठी रस्त्याने अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात चालते मात्र रस्त्यात प्रचंड खड्ड्यांचे साम्राज्य असल्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागायची तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना देखील जीव मुठीत धरून प्रवास करावा लागायचा सध्या पावसाळा सुरू झाला असून खड्ड्यांचा अंदाज येत नसल्या मुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढले होते मात्र डागडुजी व खराब रस्ते दुरुस्तीचे काम चालू झाल्याने परिसरातील नागरिकांसह अॅडव्होकेट योगेश पालकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांचे आभार मानले आहे

Post a Comment

0 Comments