आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

संजीवनी अकॅडमीच्या आदिती जोरी हिने राज्यस्तरीय स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक.


संजीवनी अकॅडमीच्या आदिती जोरी हिने राज्यस्तरीय स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक.

कोपरगाव प्रतिनिधी:----- राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर मंथन पब्लिसिटी लिमिटेड व पार्थ गारमेंट यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी सभाधीटपणा संवादकौशल्य यास वाव देण्यासाठी आयोजित ऑनलाईन राज्यस्तरीय स्पर्धेत संजीवनी अकॅडमीची विद्यार्थिनी कु. अदिती नितिन जोरी, कोपरगांव हिने प्रथम क्रमांक प्राप्‍त केला आहे.

नुकतेच मंथन पब्लिसिटी पार्थ गारमेंट

यांच्या वतीने भव्य खुल्या राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कथाकथन स्पर्धेमध्ये संजीवनी अकॅडमीमध्ये इयत्ता सहावीत शिकणाऱ्या कु. अदिती नितिन जोरी, हिने “टोपीशंकर” या कथेचे प्रात्यक्षिकासह उत्कृष्टरित्या सादरीकरण केले होते . या स्पर्धेसाठी अहमदनगर, सोलापूर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, जळगाव या शहरास राज्यभरातून ३३० पेक्षा अधिक स्पर्धक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला होता. नुकताच या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. राज्यस्तरीय स्पर्धेत तिला प्रथम क्रमांकाबद्दल रोख रक्कम, स्मृती चिन्ह, सन्मानपत्र असे बक्षीस देऊन गौरविण्यात आले .

तिच्या या यशाबद्दल संजीवनी अकॅडमीच्या संचालिका सौ. मनाली अमित कोल्हे व प्राचार्य सौ. सुंदरी सुब्रमण्यम शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments