शिर्डी साईबाबा संस्थान च्या भोजनालयतील कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या!
![]() |
शिर्डी प्रतिनिधी:---- साईबाबा संस्थान शिर्डी येथील भोजनालयातील आचारी दिलीप बाबासाहेब सांबारे वय ४५ रा कनकुरी रोड शिर्डी यांचा बाभळीच्या झाडाला गळफास घेतलेल्या मृतदेह मिळुन आला आहे संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावातील निळवंडे शिवारात सांबरे यांचा मृतदेह बाभळीच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला शुक्रवार दिनांक ९जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही खळबळजनक घटना उघडकीस आली दिलीप बाबासाहेब सांबारे यांनी फासी का घेतली ? काही घातपात तर झाला नाही ना ? अशी शंका निर्माण झाली आहे या घटनेचा पोलीस तपास करीत आहे
अधिक माहिती अशी की फासी घेतलेल्या मृतदेहाची माहिती मिळताच कामगार पोलीस पाटील अशोक कोल्हे यांनी संगमनेर तालुका पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोलीस हेडकॉन्स्टेबल विष्णू आहेर यांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी करून पंचनामा केला आहे कामगार पोलीस पाटील अशोक कोल्हे गावचे उपसरपंच नवनाथ जोंधळे सामाजिक कार्यकर्ते सुनिल उकीरर्डे यांनी झाडावरून खाली घेतला त्यानंतर संगमनेर ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला मृतदेहाजवळ एक दुचाकी आधार कार्ड व पॅनकाड सारखे ओळखपत्र मिळुन आले आहे त्यावरून मयत साईबाबा संस्थांचे कर्मचारी असल्याचे पुढे आले आहे संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत मयत दिलीप सांबरे यांच्या मागे पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे
0 Comments