आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

आमचा फक्त 6-7 कामांवरच आक्षेप आहे असे म्हणणाऱ्यांनी इतर 22 कामे

 

आमचा फक्त 6-7 कामांवरच आक्षेप आहे असे म्हणणाऱ्यांनी इतर 22 कामेही का नामंजूर केली? ---विजय वहाडणे

सौ चुहे खाके बिल्ली चली हाज,

खोटे आरोप करतांना लाज,का नाही वाटत . 
 कोपरगाव प्रतिनिधी:---- 28 कामांबाबत जनतेत गैरसमज पसरवणारी खोटारडी पत्रकार परिषद कोल्हे गटाने घेतली.मे.उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती लवकरच उठेल, कारण न्यायालयासमोर दुसरी बाजू मांडलीच गेलेली नाही.कोल्हे गट विकासकामे होऊ नये म्हणून या थराला जाईल असे वाटले नाही म्हणून आम्ही cavet दाखल केले नव्हते.

            मे. जिल्हाधिकारी यांनीं 23 मार्चला निर्णय दिल्यानंतर आ 1 महिन्यात मे.कमिशनर यांच्याकडे अपिल करता येते म्हणून आम्ही 1 महिन्यानंतर ठेकेदारांना  अनामत रक्कम भरण्याचे पत्र देऊन प्रक्रिया पूर्ण केली.दोन महिन्यात कार्यादेश दिले तरीही आम्ही कार्यादेश द्यायला 4-5 महिने उशीर केल्याचा  व मुख्याधिकारी यांनी जातांना घाईघाईत वर्कऑर्डर दिल्याचा भंपक आरोप केला जातो.

              आमचा फक्त 6-7 कामांवरच आक्षेप आहे असे म्हणणाऱ्यांनी इतर 22 कामेही का नामंजूर केली?निवडणूक आचारसंहिता लागेपर्यंत विरोध करायचा व कामेच होऊ द्यायची नाहीत हाच कोल्हे गटाचा डाव आहे.सर्वसाधारण सभेत विषय क्र.11 च्या चर्चेत सर्व 28 कामे वाचून दाखवा असे मी म्हणत असतांना बहुमताच्या जोरावर गोंधळ घालून हा विषयच नामंजूर करणारे आज खोटे बोलताहेत,सभेचे रेकॉर्डिंग बघा.

नगरसेवक अनिल आव्हाड यांनी मात्र मला राजकारणाशी घेणेदेणे नाही,माझ्या प्रभागातील काम करावेच लागेल असे आक्रमकपणे सांगितल्याने त्यांचे काम मंजूर झाले.इतर नगरसेवकांनी स्वतःच्या प्रभागातील कामे व्हावीत म्हणून

आग्रह  धरला नाही,कारण नेत्यांचा दबाव.

            मे.जिल्हाधिकारी यांनी 23 मार्चला निर्णय दिल्यानंतर दि.5/4/2021 रोजी मी स्वतः सर्व नगरसेवकांना पत्र दिले कि तुमच्या प्रभागातील कामे करायचे कि नाही हे लेखी कळवा.आजपर्यंत कोल्हे गट लेखी द्यायला तयार नाही.आमचा सर्व कामांना विरोध नाही असे ते खोटेच सांगतात.मात्र कोल्हे गटाच्याच 2-3 नगरसेवकांनी मात्र आमची कामे करा असे लेखी कळवले आहे.सर्वांनाच कामे व्हावीत असे वाटते पण नेत्यांच्या आदेशापुढे त्यांचा नाईलाज आहे.

             खरे तर एस्टीमेट म्हणजे अंदाजपत्रक.काम पुर्ण झाल्यानंतर  मोजमाप करूनच पेमेंट दिले जाते हे माहित असूनही कोल्हे गट वेड्याचे सोंग घेत आहे.पेव्हर बसविले नाहीत,डीवाईडर लावले नाहीत तर त्याचे पेमेंट होणारच नाही.पुन्हा एस्टीमेट करा म्हणणे हा ठरवून केलेला मूर्खपणा आहे.कामे व्हायच्या आधी ज्यांना भ्रष्टाचाराचा वास येतो अशाना शासनाने श्वान पथकाचे प्रमुख म्हणूनच नेमले पाहिजे.

कोल्हे गटाने भ्रष्टाचाराबद्दल न बोललेले बरे.42 कोटींच्या पाणी योजनेचे ठेकेदाराकडून कोल्हे गटाच्या एकही नगरसेवकाने किंवा त्यांच्या नेत्यांनी पैसे उकळले नसणार याची जनतेला खात्री आहे.

ज्या 2 कामांचा उल्लेख त्यांनी केला ते प्र.3 मधील खडीकरण व प्र.5 मधील गटार ही दोनही कामे स्थगित ठेवण्याचे मीच 16/2/2021च्याच सर्वसाधारण सभेत सांगितले होते,तसे रेकॉर्डिंगही आहे.प्रभाग 5 मधील माझे मित्र मात्र  आज खोटे बोलताहेत.84 लाखांच्या गटारीचे काम ज्ञानेश्वर गोसावी यांना मिळत नाही असे लक्षात आल्यावर  हे काम करू नका असे ते म्हणायला लागले.मी म्हणतो ते खरे आहे कि नाही हे संबंधित नगरसेवकांनी शपथपुर्वक सांगावे.माजी नगराध्यक्ष म्हणतात कि, आम्हाला 25% मिळतात.त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी ज्या नेत्यांनी 350 कोटी रू.आणले त्यातून त्यांना किती टक्के मिळाले? हे विचारून बघावे.

           4 वर्षे स्वतःच्या प्रभागातील कामे व्हावीत यासाठी सहकार्य करणारे-गोड बोलणारे विधानसभा पराभवानंतर मात्र "शहरातील मोक्याचे रस्ते झाले तर वहाडणेविरुद्ध बोलायचे काय? " या भीतीने नेत्यांच्या आदेशानुसार विरोध करू लागले. "विषय नामंजूर करा-तुम्हाला निवडून आणायची जबाबदारी माझी" असा उर्मटआदेश युवराजाने दिल्यानंतरच वातावरण बिघडले.

ऑन लाईन टेंडर प्रक्रिया असतांना मुर्खपणे म्हणतात कि, घरात बसून कामे वाटली.एस. जी.विद्यालय रस्ता व गुरुद्वारा रोड हे दोनही कामे करणारे ठेकेदार कोल्हे यांच्या कन्येच्या शिक्षण संस्थेत विश्वस्त होते हे मी यापूर्वीच सांगितले होते.

          कोल्हे गटाचे अनेकांना व संबंधितांना बांधकाम परवानगी-पूर्णत्वाचे दाखले देतांना मुख्याधिकारी सरोदे यांनी किती पैसे घेतले हे त्यांनी सांगितले असते तर बरे झाले असते. युवराजाला सलाम करायला श्री.सरोदे यांनी जावे असे कोल्हे गटाने अनेकदा प्रयत्न केले होते.पण ते बधले नाहीत,यामुळेच आरोप होताहेत.

असे आरोप करून नविन येणारे मुख्यधिकाऱ्यावर दबाव आण्याचाच हा प्रयत्न आहे.श्रीसरोदे यांनी  शहरविकास करण्यासाठी मला साथ दिली हेच त्यांचे मोठे पाप आहे.छातीठोकपणे सांगतो,आमच्या कारकिर्दीत सर्वात जास्त विकासकामे झालेली आहेत. 5 नं.तलावाचे कामही आम्हीच मार्गी लावत

आहोत.

              कोल्हे यांचा इतिहासही असाच आहे.धारणगावसह 5 गावांची पाणी योजना 1997 साली स्व.सूर्यभानजी वहाडणे यांनी मंजूर करून घेतली.80% कामही झाले,पण युतीचे शासन गेल्यानंतर आजपर्यंत ही योजना अपूर्णच.दुसऱ्यांना श्रेय जाऊ नये यासाठी आडकाठी आणण्याचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळालेले आहे.350 कोटी रू.निधीच्या बाता मारणाऱ्या माजी आमदारांनी या योजनेसाठी निधी का आणला नाही?

स्विमिंग टॅन्कचे थडगे बांधणारे,स्वतःचे अतिक्रमण काढू नका यासाठी गयावया करणारे,वाटा मागण्यासाठी ठेकेदारांमागे फिरणारे,गोहत्या करणाऱ्याना पाठीशी घालणारेच आज पत्रकार परिषदेत तोंड वर करून कसे बोलतात हेच आश्चर्य आहे.

पाऊस चालू असताना डांबरीकरण करत नसतात.पण कडक ऊन असेल तर करता येते.आता पत्रकार परिषद घेऊन टिका झाल्याने रस्त्यांची कामे करायला ठेकेदार धजणार नसल्याने जनतेलाच हाल सहन करावे लागणार.निवडणूक आचारसंहिता लागू होईपर्यंत कामेच होऊ द्यायची नाहीत हाच कोल्हे गटाचा कुटिल डाव आहे  असाही आरोप शेवटी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पत्रकार परिषदेत शेवटी केला आहे

Post a Comment

0 Comments