आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

काळे गटाच्या शहराध्यक्षांनी 28 कामांत मोठया प्रमाणांत भ्रष्ट्राचार आहे हे खुल्या दिलांने आमदारांसमोरच मान्य केल्यांने त्यांचे अभिनंदन--- दत्ता काले.

 काळे गटाच्या शहराध्यक्षांनी 28 कामांत मोठया प्रमाणांत भ्रष्ट्राचार आहे हे खुल्या दिलांने आमदारांसमोरच मान्य केल्यांने त्यांचे अभिनंदन--- दत्ता काले.





कोपरगांव प्रतिनिधी:----
                 कोपरगांव नगरपालिकेतील त्या 28 कामांना भ्रष्ट्राचाराचा  वास आहे याबाबतची तक्रार भाजपा सेना नगरसेवक हे गेल्या एक वर्शापासुन नगराध्यक्ष, नगरपालिका प्रशासन यांच्याकडे वेळोवेळी करीत आहे,  त्याचबरोबर जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे देखील सदर कामामध्ये भ्रष्ट्राचार असल्याबाबतचे लेखी कळविले आहे,या गोष्टीची स्पष्टपणे कबुली सत्ताधारी आमदार आशुतोष काळे यांच्या समोर काळे गटाचे शहराध्यक्ष सुनिल गंगुले यांनी दिली त्याबददल त्यांचे जाहिर अभिनंदन केलेच पाहिजे असे पत्रक भाजपाचे शहराध्यक्ष दत्ता काले यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
               श्री. दत्ता काले यांनी पुढे म्हटले आहे की, शहरातील एका जाहिर कार्यक्रमांत  काळे गटाचे शहराध्यक्ष सुनिल गंगुले यांनी शिवसेना नगरसेवकांचा व कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला त्याविषयी अधिक स्पष्टपणे बोलतांना म्हटले की, शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागातील गटारींची 87 लाखांची निवीदा नामंजुर झाली त्यात शिवसेना नगरसेवकांना 25 ते 30 लाखांचा मलिदा मिळणार होता, तो न मिळाल्यांने नगरपालिका कार्यालयात जाउन त्यांनी वाद विवाद केला.,  सुनिल गंगुले यांचे हे म्हणणे म्हणजेच याचा अर्थ त्यांनी मान्य केले की, 85 लाखाच्या कामात जर 30 लाखाचा मलिदा मिळणार होता तर साडेआठ कोटी रूपये खर्चाच्या कामात किती मलिदा मिळणार आहे हे स्पष्ट होते.  
त्याच प्रमाणे काळे गटाच्या नगरसेवकांच्या प्रभागातील हेम मेडीकल ते एस जी विद्यालय रोड  1 कोटी 60 लाख तर अहिंसा स्तंभ ते आठरे बंगला या 75 लाख रूपयांच्या कामात त्यांना किती मलिदा मिळु शकतो हे जनतेच्या लक्षात आता स्स्पष्टपणे येवु लागले आहे.   भाजपा सेना नगरसेवकांनी या 28 कामांबाबत अनेक दिवसापासुन जनहितार्थ तक्रार केली आहे.  या सर्व कामापैकी 6 कामांच्या अंदाजपत्रकात लाखो रूपयांचा भ्रष्ट्राचार आहे हेच म्हणणे आमच्या नगरसेवकांनी प्रत्येक पत्रकार परिषदा व जिल्हाधिकारी यांच्या दालनांत मांडलेले आहे त्याची वस्तुस्थिती देखील जनतेला दाखवुन दिली आहे.
                या 28 कामात नगराध्यक्षांना मिळणां-या मलिदापेक्षा जादा मलिदा काळे गटाच्या नगरसेवकांना मिळणार होता की काय अशी  शंका आता यात येवु लागली आहे.   शेवटी का होईना काळे गटाचे शहराध्यक्ष सुनिल गंगुले यांनी मान्य केले की, सदर कामात मलिदा मिळणार आहे त्यामुळे त्यंाचे आपण आभार मानतो.  त्यांनी या कामातील भ्रष्ट्राचार त्यांच्या नेत्यांच्या निदर्शनांस मोठया मनांने आणुन दिला त्यामुळे त्यांचे पुनष्च अभिनंदन. आता तरी या सर्व गोश्टींची दखल घेवुन नगराध्यक्ष व नगरपालिका प्रषासनाने 28 कामापैकी 6 कामाबाबत योग्य तेा निर्णय घेवुन जनतेच्या पैशाचा भ्रष्ट्राचार थांबवावा असे आवाहन त्यांनी केले.

Post a Comment

0 Comments