आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

संजीवनी पाॅलीटेक्निकच्या ७ विध्यार्थ्यांची यझाकीने केली निवड - अमित कोल्हे ग्रामिण विध्यार्थ्यांना नोकऱ्या मिळवुन देण्यात संजीवनी आघाडीवर

  संजीवनी  पाॅलीटेक्निकच्या ७ विध्यार्थ्यांची यझाकीने केली निवड -  अमित कोल्हे

 ग्रामिण विध्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळवुन देण्यात संजीवनी आघाडीवर



कोपरगांव प्रतिनिधी:---- मागील अनेक  वर्षांपासून  संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकने आपल्या अंतिम वर्षाच्या विध्यार्थ्यांना  नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या  मिळवुन देवुन हजारो विध्यार्थ्यांना  स्वयंपुर्ण केले आहे. अलिकडेच संस्थेच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट डिपार्टमेंटच्या प्रयत्नाने यझाकी इंडिया प्रा. लि. या ऑटोमोटिव्ह  क्षेत्रात आघाडीच्या कंपनीने संजीवनी पाॅलीटेक्निकच्या सात  विध्यार्थांची  त्यांच्या अंतिम निकाला अगोदरच ऑनलाईन  पध्दतीने मुलाखती घेवुन नेमणुक पत्रे बहाल केली आहे, अशी  माहिती  संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. 
यझाकी कंपनीने निवड केलेल्या विध्यार्थ्यांमध्ये  अजित संजय नाईकवाडे, मयुर चंद्रशेखर बाविसकर, साहील दिलीप दुशिंग , मंथन आप्पासाहेब गोसावी, दर्शन  श्रीराम सोनवणे, अमर अर्जुन सैंदोरे व श्रध्दा सुर्यकांत मोटे यांचा समावेश  आहे. 
पत्रकात श्री कोल्हे यांनी म्हटले आहे की प्रत्येक पालकाच्या दृष्टीने  त्यांची या महाकाय जगतात सर्वात मौल्यवान संपत्ती म्हणजे त्यांची मुलं-मुली असतात .  मुलं जन्माला आल्यापासुन पालक त्यांच्या पाल्यांना स्वयंपुर्ण करण्यासाठी वाटेल ती तडजोड करण्यास तयार असतात. कधी कधी त्यांच्यात शारीरिक , आर्थिक बळ नसताना देखिल पाल्यांच्या पंखात बळ भरण्याचे काम अविरत करीत असतात. अशा  पालकांच्या साथीला संजीवनी नेहमीच एक पावुल पुढे असते. पालकांच्या व पाल्यांच्या महत्वाकांक्षा पुर्ण करण्यासाठी संजीवनीचे व्यवस्थापन अनोखा पॅटर्न राबवित आहे. त्यामुळे संजीवनीने आज पर्यंत हजारो विध्यार्थ्यांना   नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या  मिळवुन दिल्या आहेत तर काहींना यशस्वी उद्योजक बनविले आहे. संजीवनीचे अनेक माजी विध्यार्थी शासकीय  सेवेतही आहेत. अनेक पालक संजीवनी प्रति कृतज्ञता व्यक्त करतात. अजुनही अनेक नामांकित कंपन्यांच्या संपर्कात संस्था असुन जास्तीत जास्त विध्यार्थ्यांना    नोकरी देण्याचा प्रयत्न चालु आहे. संजीवनीचे माजी विध्यार्थीही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये प्रामाणिकपणे काम करून तेथिल व्यवस्थापनास मदत करीत आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांची संजीवनीच्या विध्यार्थ्यांना    प्राधान्याने पसंती असते, असे श्री कोल्हे यांनी पत्रकात म्हटले आहे. 
माजी मंत्री व संजीवनी गु्रप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  संस्थापक अध्यक्ष श्री शंकरराव  कोल्हे, कार्याध्यक्ष श्री नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व विश्वस्त  श्री सुमित कोल्हे यांनी सर्व यशस्वी विध्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले तसेच प्राचार्य ए. आर. मिरीकर व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट  ऑफिसर  प्रा. आय. के. सय्यद यांचेही अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments