पाच नंबर साठवण तलावासाठी ना.नितीनजी गडकरी व मा.श्री.शरदरावजी पवार यांचेच सहकार्य
---- विजय वहाडणे
कोपरगाव प्रतिनिधी:-----
पाच नंबर साठवण तलाव व्हावा यासाठी मी स्वतः नोव्हेंबर 2018 मध्ये दिल्ली येथे जाऊन केंद्रीय मंत्री ना.नितीनजी गडकरी यांची श्री.श्यामजी जाजू यांच्यासमवेत भेट घेतली.पाच नंबर साठवण तलाव मुंबई-नागपूर एक्सप्रेस हायवेचे काम करणाऱ्या " गायत्री"
कंपनीच्या माध्यमातून व्हावा यासाठी ना.गडकरी साहेबांना कोपरगाव शहराच्या पाण्याची भीषण दुरावस्था अवगत केली.त्यांनीही त्वरित दखल घेऊन गायत्रीच्या रेड्डी यांना हैदराबादला फोन लावून खोदकाम करण्याचे निर्देश दिले व त्यानुसार त्यांनी खोदकामही सुरू केले.त्याही अगोदर मी श्री.संजयजी काळे,नितीन शिंदे यांचेसह शिर्डी येथे श्री.रेड्डी यांची भेट घेऊन प्राथमिक चर्चा केली होती.पण त्यांनतर पाच नंबर तलावाचे काम सुस्तावले. त्या कामात कोण आडवे पडले,गायत्री कंपनीवर कुणी दबाव आणला हे जनतेला माहित आहे.

त्यानंतर विधानसभा निवडणुकीत श्री.आशुतोषजी काळे निवडून आले.त्यांनी मा.श्री.शरदरावजी पवार साहेबांकडे पाठपुरावा करून हे काम पुन्हा सुरू केले.आता पाच नंबर साठवण तलाव ( सिमेंट काँक्रीट) व संबंधित कामाचे इस्टीमेट तयार करून तांत्रिक मान्यतेची प्रक्रिया सुरू आहे.
माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता दिल्लीपर्यंत पाठपुरावा करू शकतो,पण पाच वर्षे राज्यात व देशातही भाजपाची सत्ता असतांना भाजपाच्या त्यावेळच्या आमदारांना हे का जमले नाही?
त्यांना जमते फक्त अडथळे आणणे.असेही ही नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रसिद्धी पत्रकात शेवटी म्हटले आहे

0 Comments