– आ. आशुतोष काळे
कोपरगाव प्रतिनिधी:--- मागील वर्षी आलेल्या कोरोनाच्या संकटाच्या एकामागून एक लाट येत आहे. दुसऱ्या लाटेचा कहर संपत नाही तोच आरोग्य विभागाकडून तिसऱ्या लाटेचे संकेत देण्यात आले आहे. अशा परिस्थितीत दुसऱ्या लाटेत बाधित रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने ज्या अडचणींना सामोरे जावे लागले भविष्यात अशा अडचणी निर्माण होऊ नये. यासाठी बूनलाईंज (Boonlinez) मोबाईल ॲपच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती होऊन नागरिकांना योग्य माहिती मिळणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.बूनलाईज कंपनीचे सीईओ महेश थोरात यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रासाठी तयार करण्यात आलेल्या बूनलाईंज (Boonlinez) कोपरगाव या मोबाईल अॅपचे व 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी मेमरी फोटो काँटेस्ट' चे उदघाटन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, बूनलाईंज कोपरगाव अॅप तयार करतांना कोपरगाव तालुक्यातील महसूल, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग व विविध शासकीय कार्यालयांकडून मिळणाऱ्या सोयीसुविधांची माहिती त्या-त्या कार्यालयाकडून समाविष्ट करण्यात आलेली असून आपत्कालीन काळत नागरिकाना वेळेत मदत उपलब्ध व्हावी यासाठी महत्वपूर्ण माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना अचूक महिती मिळून नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होणार नाही. तसेच सामाजिक बांधिलकी जोपासतांना महेश थोरात यांनी ऑनलाईन खरेदीपासून नागरिकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी व स्थानिक व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आलेल्या “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन बून लाईंज वर करण्यात आले असून नागरिकांना बक्षीस जिंकण्याची विनाशुल्क उपलब्ध करून दिलेली संधी कौतुकास्पद असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
चौकट :- मागील काही वर्षापासून कोपरगाव शहरातील व्यापाराला उतरती कळा लागली असतांना कोरोना संकटामुळे स्थानिक व्यापाऱ्यांच्या अडचणी वाढल्या होत्या अशातच ऑनलाईन खरेदीला नागरिकांचा मिळत असलेला प्रतिसाद त्यामुळे व्यापाऱ्यांच्या अडचणीमध्ये भर पडली. अशा परिस्थितीत आमदार आशुतोष काळे यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी उचललेले पाऊल व कोपरगाव शहरातील रस्त्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीमुळे कोपरगाव तालुक्यातील व्यापार वृद्धिंगत होण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती झाली आहे. सुधीर डागा (सचिव, व्यापारी महासंघ)
यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, हाजी मेहमूद सय्यद, सुधीर डागा, डॉ. अजय गर्जे,एस.एस.जी.एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. थोपटे सर, संतोष चवंडके, दिनार कुदळे, रमेश गवळी, दिनकर खरे, फकीरमामु कुरेशी,बाळासाहेब रुईकर, राहुल देवळालीकर,अशोक आव्हाटे, राजेंद्र खैरनार, नारायण लांडगे, वाल्मिक लहिरे, आकाश डागा, मुकुंद इंगळे, संतोष शेलार, एकनाथ गंगूले, सुरेश सोनटक्के, इम्तियाजभाई अत्तार, अंबादास वडांगळे, संदीप कपिले, शुभम लासुरे, महेश उदावंत, हारूण शेख, राहुल चवंडके, याकूब शेख आदी उपस्थित होते.
0 Comments