आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी गटांना खरिपासाठी विविध बियाणांचे वाटप

 0

आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली  शेतकरी गटांना खरिपासाठी विविध बियाणांचे वाटप

            


     कोपरगाव प्रतिनिधी----- खरीप हंगामात कोपरगाव तालुक्यासाठी जास्तीत जास्त बियाणे मिळावे यासाठी प्रयत्न करावे असा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी कृषी विभागाला केल्या होत्या. त्या सूचनेनुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजनांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या सोयाबीन, बाजरी, मका, तूर आदी बियाणांचे वाटप कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकतेच पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने व उपसभापती अर्जुनराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे. तालुक्यातील शेतकरी गटांना गळीत धान्य अभियान अंतर्गत ४३ शेतकरी गटांची सोयाबीन प्रकल्पासाठी निवड करण्यात येवून या गटांना २३६.५० क्विंटल सोयाबीन बियाणे, तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत बाजरीसाठी ६ शेतकरी गटांना २.४० क्विंटल, मका ४ शेतकरी गटाला ६.०० क्विंटल, तूर एका शेतकरी गटाला ३.५ क्विंटल बियाणांचे,मका अधिक सोयाबीन २ गटांना ७ क्विंटल असे एकूण जवळपास २५० क्विंटल बियाणे प्रातिनिधिक स्वरूपात आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाटप करण्यात आले.                 

               याप्रसंगी बोलतांना उपसभापती श्री अर्जुनराव काळे म्हणाले की, मागील वर्षी या अभियानाअंतर्गत १०५.०० क्विंटल बियाणांचे वाटप करण्यात आले होते. यावर्षी त्यामध्ये वाढ होवून २३६.५० क्विंटल सोयाबीन बियाणाचे वाटप करण्यात आले. सोयाबीनला चालू वर्षी उच्चांकी दर मिळाल्यामुळे बहुतांश शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळले आहे. यावर्षी जास्तीत सोयाबीनचे उत्पन्न घेण्याचा शेतकऱ्यांचा कल आहे. आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांमुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीणचे बियाणे उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी निश्चितपणे कमी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

                      यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर      शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, पंचायत समिती सदस्य श्रावण आसने, राहुल जगधने, सुधाकर होन, प्रसाद साबळे, विठ्ठल जावळे, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, मंडल कृषी अधिकारी अविनाश चंदन, चांगदेव जवने, सौ. माधुरी गावडे, मनोज सोनवणे, पर्यवेक्षक राजेश तुंबारे,कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक व शेतकरी गटांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            चौकट :- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांना खरीप हंगामाची तयारी करतांना सोयाबीन तसेच अन्य बियाणांची बियाणे टंचाई निर्माण होऊ नये यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त बियाणे उपलब्ध करावी अशा सूचना  केल्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या प्रयत्नातून  सर्व  योजनेतून जिल्ह्यात सर्वात जास्त सोयाबीन बियाणे कोपरगाव तालुक्याला मिळाले आहे. या २५०क्विंटल बियाणांबरोबरच ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करून ज्या शेतकऱ्यांनी प्रमाणित बियाणे मागणी नोंदविली होती त्यांची लकी ड्रॉ पद्धतीने निवड झाली आहे. त्यामध्ये देखील १६० क्विंटल सोयाबीन बियाणे परमिटवर मिळाले आहे. आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनातून कोपरगाव तालुक्यासाठी उपलब्ध झाले आहे. खाजगी कृषी सेवा केंद्रांकडे देखील बियांण्यांचा साठा उपलब्ध असल्यामुळे बियाणे टंचाई जाणवण्याची शक्यता नाही.परंतु शेतकऱ्यांनी आपल्या कडील घरगुती बियाणे उगवण क्षमता चाचणी घेऊन व बिज प्रक्रिया करुन पेरणी करीता वापरावे म्हणजे त्यांच्या उत्पादन खर्चात बचत होईल.

तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव.

Post a Comment

0 Comments