कोवीडचे नियम पाळा, अन्यथा पुन्हा संचारबंदी लागू शकते
------ नगराध्यक्ष विजय वहाडणे.
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:----
कोपरगाव शहरातील लहान मोठे व्यावसायिक-दुकानदार व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून जनता संचारबंदी यशस्वी केल्यामुळे कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला,मृत्यूचे प्रमाणही कमी झाले. पण आता शासनानेच
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व व्यवहार पूर्ववत सुरू करायला मान्यता दिली.अचानक सर्वच व्यवसाय सुरू झाल्याने बाजारपेठेत प्रचंड गर्दि वाढल्याचे दिसते .खरेतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी सुरक्षित अंतर न ठेवल्यास पुन्हा प्रादुर्भाव वाढू शकतो.असा इशारा नगराध्यक्ष विजय वाढणे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिलेला आहे त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की,खरेतरनागरिकांनी संचारबंदी नसली तरी फक्त अत्यंत गरज असेल तरच घराबाहेर पडले पाहिजे. मास्कविना कुणीही घराबाहेर पडूच नये.कारवाई करायची वेळ येऊच नये.
नागरिकांनी जर नियम पाळले नाहीत,प्रशासनाने दिलेल्या सूचना अमलात आणल्या नाही तर कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू शकतो याचे भान ठेवले पाहिजे.कोपरगाव तालुक्यात नुकताच एक विवाह सोहळा झाला.पण त्या लग्नाला उपस्थित असणाऱ्या पैकी 14 जण कोरोना पोसीटीव्ह झाल्याचे समजते.पुन्हा संचारबंदीची आपत्ती येऊ द्यायची नसेल तर सर्वांनीच आपले व्यवहार करतांना काळजी घेतलीच पाहिजे.दुर्दैवाने कोरोना प्रादुर्भाव वाढत गेला तर शासन पुन्हा संचारबंदी जाहिर करू शकते हे प्रत्येकाने लक्षात घेणे महत्वाचे आहे. असेही नगराध्यक्ष विजय वाहाडणे यांनी शेवटी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे

0 Comments