आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

अन्नदान करणे पडले महागात; कोरोनो काळात गर्दी जमावल्याने आयोजकांवर गुन्हा दाखल.

अन्नदान  करणे पडले महागात; कोरोनो काळात गर्दी जमावल्याने आयोजकांवर गुन्हा दाखल.




शिर्डी प्रतिनिधी:-----
सोमवार  दिनांक  २८जुण  रोजी रात्री ८वाजेच्या सुमारास  १६ गुंठे परिसर, शिर्डी या ठिकाणी मधूस्वामी पद्मनाभन नायर, वय 51 वर्षे, रा. साई श्रद्धा हाऊसिंग, शिर्डी यांनी अन्नदान करीत असताना आढळून आले आहे      गर्दी जमवून कोरोना रोगाचा संसर्ग होईल हे माहीत असतानाही जिल्हाधिकारी कार्यालया कडील आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांचे विरोधात भादवि 188 प्रमाणे शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांनी दिली

        अधिक माहिती अशी की        काही  विनापरवाना  कोरोणा आजाराचा प्रादुर्भाव सुरू आहे हे माहिती असताना शिर्डी शहरात व मंदिर परिसरात  अन्नदान करून गर्दी जमविण्याचा प्रयत्न  करत असल्याचे  निदर्शनास आले आहे  तसे केल्यास त्यांचे विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा  शिर्डी पोलिसांनी दिला असून  काही लोक अन्नदान  पुण्य दान आहे या भावनेतून अन्नदान करतात  हे चुकीचे असुन यापुढील काळात जर कोणी असे अन्नदान करण्यासाठी गर्दी गोळा करून प्रादुर्भाव वाढवण्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्याच्या विरोधात कठोर कारवाई केली असा स्पष्ट इशारा शिर्डी पोलिसांनी दिला आहे

Post a Comment

0 Comments