आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

“कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी यांचा कोरोना योद्धा सन्मान”


कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी यांचा कोरोना योद्धा सन्मान”
कोपरगाव प्रतिनिधी:----
शुक्रवार रोजी कोपरगाव नगरपरिषद कार्यालय येथे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या वर्ग अ पदी पदोन्नती व बदली औचित्य प्रसंगी, कोरोना महामारीत पहिल्या व दुस-या लाटेत आपल्या जीवाची पर्वा न करता कोपरगाव शहराचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी अहोरात्र कष्ट घेणारे नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा कै.खा.श्री.सूर्यभानजी पाटील वहाडणे प्रतिष्ठाणच्या वतीने कोरोना योद्धा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले.

याप्रसंगी प्रातिनिधीक स्वरूपात मुख्याधिकारी प्रशांत सरोदे साहेब, उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे, बांधकाम अभियंता डिगांबर वाघ, नागरी प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.गायत्री कांडेकर, प्र.आरोग्य निरीक्षक सुनील आरण, स्वच्छता मुकादम मनोज लोट, स्वच्छता कर्मचारी जयश्री निन्दाने, आशा वर्कर सुवर्णा वायखींडे यांना कोरोना योद्धा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले

तसेच नगरपरिषदेच्या अधिकारी वर्गा पासून स्वच्छता कर्मचारी पर्यंत यांना प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी जागेवर जावून कोरोना योद्धांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले

     या समारंभ प्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, गटनेते योगेश बागुल, विरेन बोरावके, नगरसेवक संदीप वर्पे, महमूद सय्यद, मंदार पहाडे, अनिल आव्हाड, अनिलशेठ काले, माजी नगरसेवक संजय कांबळे, राजेंद्र खैरे, मनसेचे अनिल गायकवाड,  युवासेननेचे सनी वाघ, गोदामाई प्रतिष्ठानचे आदिनाथ ढाकणे, विद्यार्थी सहाय्यक तालुका समितीचे अध्यक्ष हिरालाल महानुभव यांच्या यासह मोठ्या संख्येने शहरातील नागरिक, व्यापारी, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महारुद्र गालट यांनी केले.

Post a Comment

0 Comments